Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'पणजीचे आमदार लोकांचे प्रश्‍न ऐकत नाहीत'! पर्रीकरांचे टीकास्त्र; पार्किंग समस्येवरुन साधला निशाणा

Utpal Parrikar: ज्यांनी आमच्याकडे समस्या मांडल्या, त्याची सोडवणूक करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रश्न मांडणे आवश्यक आहे आणि आपण ते काम करीत आहोत, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजी शहरातील नागरिकांच्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचे काम स्थानिक आमदाराचे आहे. परंतु पणजीत आमदार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत नाहीत, तर नागरिकांना त्यांच्याकडे जाऊन समस्या मांडाव्या लागतात, अशी स्थिती आहे. परंतु ज्यांनी आमच्याकडे समस्या मांडल्या, त्याची सोडवणूक करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रश्न मांडणे आवश्यक आहे आणि आपण ते काम करीत आहोत, असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

उत्पल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आल्यानंतर वरील मत माडंले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पणजीतील एम. जी. रोडच्या बाजूच्या घारसे टॉवरजवळील रहिवाशांना पार्किंग सुविधेशी संबंधित दैनंदिन समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

या इमारतीतील रहिवाशांनी अलिकडेच आपल्याकडे हा प्रश्न माडंला होता. बऱ्याच काळापासून, या निवासी इमारतीतील विशिष्ट जागा घारसे टॉवरमधील रहिवासी त्यांच्या दुचाकी पार्किंगसाठी वापरत आहेत. अलीकडेच, हे क्षेत्र अधिकृतपणे केवळ चारचाकी पार्किंगसाठी चिन्हांकित केले आहे.

मुख्य मुद्दा असा आहे की, त्या जागेवर चारचाकीऐवजी अधिकतर दुचाकी वाहने बसू शकतात. परंतु नव्या धारणेमुळे स्थानिक रहिवाशांच्या दुचाकी पार्किंग पर्यायांवर मर्यादा आल्या आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांच्या घरापासून बराच अंतरावर आपली वाहने पार्क करावी लागताहेत. ही परिस्थिती स्थानिकांसाठी अडचणीची आणि सुरक्षिततेच्या समस्या निर्माण करते.

नाहक पडतो पाचशे रुपयांचा भुर्दंड

जे रहिवासी गरज नसताना जवळच्या उपलब्ध जागेत (आता अधिकृतपणे चारचाकी वाहनांसाठी चिन्हांकित) त्यांची दुचाकी पार्क करतात, परंतु त्यांच्या नावे पाचशे रुपयांचे चलन फाडले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण वैयक्तिक हस्तक्षेप करावा, तसेच पार्किंग सुविधांचा आढावा घ्यावा व त्यानुसार वाहतूक पोलिसांना निर्देश द्यावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budh Gochar 2026: 15 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींवर होणार धनवर्षा, ग्रहांच्या राजकुमाराची बदलणार चाल; संपणार घरातील कटकटी

Kushavati: गोव्यातला महाकाय भग्न नंदी, शिवालयाचे भग्नावशेष, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा कोट; 'कुशावती' नदीकाठी वसलेली संस्कृती

इम्रान खान यांचं समर्थन करणं पडलं महागात! पाकिस्तानात 4 पत्रकारांसह 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; सोशल मीडिया पोस्ट ठरली गुन्हा

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT