पणजी: गोव्यात डोंगर कापणी, बांधकाम प्रकल्प, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचा कारभार मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरतोय. त्यामुळे गोव्यात राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात अंदाधुंद कारभार सुरू आहे. यावर उत्पल पर्रीकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना आपल्या मनातील खंत बोलून दाखविली. याच संवादातील काही महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे...
लोकांकडे जाण्याची गरज आहे. लोकांचे विषय सरकारने आपले विषय असे समजून काम करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया खूपच कमी प्रमाणात होताना दिसतेय. आता हेच उदाहरण घ्या की, राज्याचे मुख्य सचिव रूपांतरित केलेली शेतजमीन विकत घेत आहेत. ते टीसीपीच्या पोझिशन ऑफ ऑथॉरिटीवर आहेत. त्यांनी जमीन विकत घेणं कायदेशीर की बेकायदेशीर, हा वेगळा विषय. पण अशा प्रकारांमुळे लोकांना वाटू लागतं की, सरकार त्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही. लोकांमध्ये ही अस्वस्थतेची भावना वाढत चाललीय, ही वस्तुस्थिती आहे.
हे मोठे बांधकाम प्रकल्प गोव्याला कुठे नेऊन ठेवणार, हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला आणखी एक मुंबई झालेली पाहिजे आहे का? पणजीच्या शेजारी येणारा डीएलएफचा बांधकाम प्रकल्प सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. या अशा बांधकाम प्रकल्पांमुळे आपला ‘ब्रॅण्ड गोवा’ धोक्यात आलाय. मला तर आता त्याच्या बाजूच्या डोंगराची चिंता सतावू लागलीय. सरकारने अशा प्रकल्पांच्या मर्यादा ठरविण्यासाठी धोरण आखणे गरजेचे आहे. देशपातळीवर गोव्याची मागणी प्रचंड आहे. प्रत्येक दिल्लीवाला गोव्यात येण्यास इच्छुक आहे. याचा अर्थ आम्ही सगळ्यांना सामावून घेणे, असा अजिबात होत नाही. गोव्याच्या रक्षणाचा स्पष्ट संदेश लोकांमध्ये जाणे गरजेचे आहे. तसे झाले तरच सरकारला लोकांचा पाठिंबा मिळेल.
हे मोठे बांधकाम प्रकल्प गोव्याला कुठे नेऊन ठेवणार, हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला आणखी एक मुंबई झालेली पाहिजे आहे का? पणजीच्या शेजारी येणारा डीएलएफचा बांधकाम प्रकल्प सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. या अशा बांधकाम प्रकल्पांमुळे आपला ‘ब्रॅण्ड गोवा’ धोक्यात आलाय. मला तर आता त्याच्या बाजूच्या डोंगराची चिंता सतावू लागलीय. सरकारने अशा प्रकल्पांच्या मर्यादा ठरविण्यासाठी धोरण आखणे गरजेचे आहे. देशपातळीवर गोव्याची मागणी प्रचंड आहे. प्रत्येक दिल्लीवाला गोव्यात येण्यास इच्छुक आहे. याचा अर्थ आम्ही सगळ्यांना सामावून घेणे, असा अजिबात होत नाही. गोव्याच्या रक्षणाचा स्पष्ट संदेश लोकांमध्ये जाणे गरजेचे आहे. तसे झाले तरच सरकारला लोकांचा पाठिंबा मिळेल.
एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला आता भीती वाटू लागलीय. गोवा हा देशातील अनियोजित आजारी शहरांप्रमाणे झालेला नकोय. लहानपणी आम्हाला दाखविण्यात यायचे की, बंगळुरू ही गार्डन सिटी आहे. पण आज त्याच बंगळुरूची काय स्थिती झालीय, हे सर्वांना माहिती आहे. गोव्याचा ब्रॅण्ड हा वेगळा आहे. तो सांभाळण्यासाठी त्याच पद्धतीने आम्हाला आखणी करणे गरजेचे आहे. मोठमोठ्या बिल्डरमुळे प्रत्येकजण भयभीत आहे. सध्या लोंढेच आलेत. उद्या हिरानंदानी येतील, परवा रहेजा येतील, याची भीती वाटू लागलीय. गोव्यात उदभवलेल्या या स्थितीची माहिती देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्याचे ठरविले आहे.
माझे वडील नेहमी सांगायचे की, प्रशासन हे बाटलीतील पाण्याप्रमाणे असते. जसा बाटलीला आकार, तसे प्रशासन. हे अत्यंत चुकीचे आहे. मागच्यावेळी जेव्हा डीजीपींचे प्रकरण घडले, तेव्हाही मी बोललो होतो. पण याचा अर्थ सर्वच अधिकारी वाईट असतात, असे नाही. माझ्या वडिलांच्या काळात मी अनेक चांगले अधिकारीही पाहिले आहेत, ज्यांनी गोव्यासाठी खूप योगदान दिले होते. कोणत्या अधिकाऱ्यांना जवळ ठेवावे, कोणाला दूर ठेवावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
यावर मी काय बोलू? ज्यांनी देवालाही फसवले, त्यावर मी काय सांगणार. हे विधान हास्यास्पद आहे, असे मी म्हणणार नाही. मात्र, स्थिती तशी आहे. याच परिस्थितीमुळे माझ्यावर संघर्षाची वेळ आलीय. याच कारणांमुळे मी सध्या भाजपबाहेर आहे. माझी याच सगळ्या परिस्थितीशी लढाई सुरू आहे, एवढेच मी यावेळी सांगेन.
माझ्या वडिलांच्या विचारांनुसार मला गोव्याची वाटचाल अपेक्षित आहे. गोव्याचे अस्तित्व अबाधित राहणे महत्त्वाचे आहे; पण ते कठीण काम आहे. राजकारणात अनेकजण फक्त तडजोडीसाठी आहेत. शेवटी सर्व काही लोकांच्या हातात आहे. हे सरकार जर लोकांना गोव्याचे अस्तित्व सांभाळण्याचा विश्वास देऊ शकले तर ती एक चांगली गोष्ट ठरेल.
मला या सोहळ्याचे निमंत्रणच नव्हते. पण त्यावर मी का भाष्य करावे? या कृतीतून माझे नाही तर समोरच्याचे प्रतिबिंब दिसते. जेव्हा माणूस कठीण मार्गावरून चालतो, तेव्हा त्याच्या वाट्याला हे सर्व येतच. काहींचा माझ्याबाबतीत वैयक्तिक रोष आहे आणि त्याचे कारण त्यांच्या मनातील माझ्याबद्दलची अनामिक भीती हे आहे.
मी माझ्या विचारांवर ठाम आहे आणि कायम असेन. मी लोकसभेवेळी नरेंद्र मोदी यांना पाठींबा देण्याची स्पष्ट भूमिका घेतली. गोव्यातील राजकीय स्थिती सुधारण्याबाबत पक्ष योग्य ती पावले उचलेल, असा मला विश्वास आहे. मी काही मिळविण्यासाठी कधीच लाचारी करत नाही. माझा विचार आणि भूमिका स्पष्ट असते. जर लोकांना मला समर्थन द्यायचे असेल तर ते देतील. मी हे माझ्या वडिलांकडूनच शिकलोय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.