Usgao hill cutting Dainik Gomantak
गोवा

Usgao: जिलेटीनचा स्फोट, दगडाची वाहतूक; उसगावात रात्री चालतो छुपा कारभार; बेसुमार डोंगरकापणीमुळे नागरिक भयभीत

Usgao Hill Cutting: उसगाव पंचायत क्षेत्रातील पार येथे ब्रेकर आणि जिलेटिनच्या साहाय्याने बेकायदा डोंगरकापणीसह दगडफोडीचे काम जोरात सुरू असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: उसगाव पंचायत क्षेत्रातील पार येथे ब्रेकर आणि जिलेटिनच्या साहाय्याने बेकायदा डोंगरकापणीसह दगडफोडीचे काम जोरात सुरू असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उसगावचे सरपंच प्रकाश गावडे यांनी आज पंचायत मंडळासह या ठिकाणाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत कोमुनिदादचे पदाधिकारी आणि तलाठीही उपस्थित होते. आम्ही अशा बेकायदेशीर कामांना थारा देणार नाही. यावर कडक कारवाई करण्यासाठी संबंधित खात्याकडे तक्रार करणार असल्याचे सरपंच प्रकाश गावडे यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी फोंडा पोलिसांनी या ठिकाणी लोकांच्या तक्रारीनुसार पाहणी केली होती; पण हे प्रकरण त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याने त्यांनी संबंधित खाते व पंचायतीला याविषयी कारवाई करण्यासाठी कळविले होते; पण संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येते.

रात्रीस खेळ चाले...

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वे नंबर ९६/० या कोमुनिदादच्या जागेत गेल्या वर्षापासून सर्व खात्यांना अंधारात ठेवून बेकायदेशीरपणे डोंगर कापून दगडफोडीचे काम सुरू आहे. हे काम दिवसा बंद असते आणि रात्री जोरात सुरू असते. ब्रेकरद्वारे जमिनीला होल पाडून त्यात जिलेटिनच्या काड्या घालून स्फोट करतात आणि मोठमोठे दगड फोडतात. मोठ्या दगडाचे नंतर जेसीबीच्या ब्रेकरद्वारे बारीक तुकडे केले जातात. या ठिकाणाहून दररोज रात्री अनेक वाहनांमधून हे दगड नेले जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT