Sunburn Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn: सनबर्नमध्ये अमली पदार्थांचा वापर होतोय? दोन मुलींनंतर दुसऱ्या दिवशी एकाची तब्येत बिघडली

महोत्सवात अमली पदार्थ सेवन केल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Pramod Yadav

Sunburn Goa 2023: हजारो पोलिसांचा बंदोबस्त, अल्कोहोल आणि अमली पदार्थ तपाणीसाठी मशीन्स आणि जागोजागी पोलिसांची नजर तरीही सनबर्नमध्ये गैरप्रकार होत असल्याची चर्चा सध्या गोव्यात रंगली आहे. सनबर्न महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महोत्सवात दोन मुलींची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी असाच एक प्रकार घडला असून, एक तरुणाची तब्येत बिघडली.

महोत्सवात अमली पदार्थ सेवन केल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

सनबर्न महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याने एक स्टेज पोलिसांनी बंद केले. महोत्सवाची सागंता झाल्यानंतर दोन मुली अस्वस्थ झाल्याचा व्हिडिओ समोर आला. मुलींना रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी देखील अशाच प्रकारची एक घटना समोर आली. यात एक तरुण अस्वस्थ झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, महोत्सवात अमली पदार्थ सेवन केल्याने त्यांची तब्येत बिघडली अशी चर्चा सध्या सुरु आहे. पोलीस बंदोबस्त आणि वारंवार तपासणी होत असताना देखील महोत्सवात अमली पदार्थाची विक्री होतेय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यावर्षी सनबर्न महोत्सव विविध कारणांनी चर्चेत आला, महोत्सवात ध्वनी मर्यादेचे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने आयोजक समितीने दिले आहेत. याचा पहिल्याच दिवशी प्रत्यय आला, ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी महोत्सवाचे एक स्टेज नऊ वाजताच बंद केले.

तसेच, महोत्सवादरम्यान महादेवाचा फोटो वापरल्याने आप नेते अमित पालेकरांनी हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हणत आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस महासंचालकांनी याची दखल घेण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT