Valpoi Market  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: वाळपई बाजारासाठी नवीन संकुलाची नितांत गरज

आठवडा बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांची व ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

दैनिक गोमन्तक

वाळपई येथे दर मंगळवारी भरणारा आठवड्याचा बाजार हा सर्वदूर प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा बाजार भरत आहे. पूर्वी तो मासोर्डे गावात जाणाऱ्या एका रस्त्यावर भरायचा.

सर्व व्यापारी रस्त्यालगत बसून व्यवसाय करायचे. पण मागील दहा वर्षांपासून या बाजाराचे विभाजन केल्याने त्‍यात सुरळीतपणा, सुटसुटीतपणा आला आहे.

मासोर्डे गावाच्या रस्त्यावर केवळ कपडे, चप्पल, बॅगा अशा व्यावसायिकांना जागा दिलेली आहे. तर फळे, भाजीविक्रेत्‍यांना वाळपई पालिका मैदानाच्या ठाणे येथे जाणाऱ्या रस्त्यावर बसविले आहे.

बाजाराच्या विभाजनामुळे वेगळपणा जाणवत असला तरी वेगळ्या बाजार संकुलाचा विचार आवश्यक आहे. कारण आठवडा बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांची व ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ताण वाढलाय.

ताडपत्रीच्या आधारावर रस्त्यालगत गटारांवर बसविलेल्या लाद्यांवर विक्रेते बसत आहेत. या लाद्या विक्रेत्यांचा आधार बनला आहे. वाळपई आठवडी बाजारात पूर्वी ५० ते ६० विक्रेते येत होते, मात्र आता ही संख्या दीडशेहून अधिक वाढलेली आहे.

बाजाराला सुटसुटीतपणा आला असला तरी दुचाकीस्‍वार अधूनमधून तेथूनच वाहने हाकतात. तसेच भटक्या गुरांचा संचारही वाढला आहे. त्‍यामुळे विक्रेत्‍यांबरोबरच ग्राहकांनाही मन:स्‍ताप सहन करावा लागतोय.

मासोर्डे रस्‍त्‍यावरील जागेचा प्रस्‍ताव आहे विचाराधीन

पाच वर्षांपूर्वी वाळपई पालिकेने मासोर्डे मार्गावर एका जागेची पाहणी केली होती. तेथे नवीन बाजार संकुल उभारण्याच्या हालचाली होत्या. त्याचा पाठपुरावा आवश्यक आहे. आठवडा बाजार सुसज्ज अशा जागेत भरू लागला तर वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

सध्‍या जे व्यावसायिक वाळपईत रस्‍त्‍यालगत बसून व्यवसाय करतात, त्यांना कोणत्‍याही सुविधा नाहीत. मुख्यत: शौचालय व पाण्याची सोय गरजेची आहे. कारण परराज्यांतून दूरवरून बरेच विक्रेते वाळपईत येतात.

त्यांना गटारांच्या लद्यांवर बसून व्यवसाय करावा लागतोय. नवीन बाजार संकुल बांधले गेले तर त्या ठिकाणी सुविधा देता येतील.

"वाळपई शहराला जुना इतिहास आहे. व्यवसायात वाढ होत आहे. मंगळवारचा आठवड्याचा बाजार ग्रामीण भागासाठी मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. विक्रेत्‍यांचे दोन ठिकाणी विभाजन केल्याने बाजारात सुरळीतपणा आलेला आहे."

"आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मंडळ कार्यरत असून बाजाराला भविष्यात आणखी चांगले दिवस आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत."

शेहझीन शेख, नगराध्यक्ष (वाळपई)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT