Sattari News: हसत, खेळत शिका अन्‌ खूप खूप मोठे व्‍हा! सत्तरीत विविध उपक्रम

नवीन शैक्षणिक धोरणाला मिळतोय उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद, पालकांत समाधान
Sattari News
Sattari NewsDainik Gomantak
Published on
Updated on

सपना सामंत

शिक्षणाचा पाया आणखी मजबूत करण्‍यासाठी हसत खेळत शिक्षण देण्‍याची सुरूवात सत्तरी तालुक्‍यात झालेली आहे. ३४ वर्षांनंतर गोव्याची शैक्षणिक पद्धती बदलण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांच्या पंचकोश तत्त्वांचा विकास होणार आहे.

ज्याप्रमाणे अंड्यातून नवीन जीव तयार होत असतो, तशाच प्रकारे नवीन शैक्षणिक धोरणातून बौद्धिकदृष्ट्या मुलांच्या क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. यामुळे नवीन शैक्षणिक धोरणानुसार येणाऱ्या मुलांना चांगल्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे महत्त्वाचे आहे. नवीन शिक्षण धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरेल, ज्यायोगे ते आपला शैक्षणिक विकास सहज साधू शकतील.

शहरातील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे ते टक्केवारीत पुढे असतात, पण उच्च शिक्षणात मागे पडतात. ग्रामीण विद्यार्थी स्वतः शिकत असल्यामुळे अभ्यास मन लावून केल्यास तो मागे पडूच शकत नाही.

या मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्वाचे आहे. प्राथमिक अवस्थेत मुलांची जडणघडण होण्यासाठी पंचकोशात्मक विकास झाला पाहिजे.

मनोमय कोश, प्राणायाम कोश, अन्न कोश, विज्ञान कोश, आनंदमय कोश याद्वारे जडणघडण झालीच तर माणसाचा विकास होतो.

Sattari News
Tourist Fight Video : चोर्ला घाटात पर्यटकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी; ट्रॅफिक झाले जॅम

शैक्षणिक धोरणामुळे मुलांच्या पंचकोश तत्त्वांचा विकास होणार असून खऱ्या अर्थाने त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासाला चालना मिळेल. शिक्षकांबरोबरच पालकांचीही जबाबदारी आता वाढली आहे.

अनुभवातून शिक्षण घेण्याची नवीन पद्धत सुरू होत असून मुले अनुभवातून शिक्षण घेणार आहेत. त्यामुळे भविष्यात घेतलेल्या शिक्षणाचे अमृत चिरंतकाल टिकून राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा योग्य वापर, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, क्षमता विकास आणि शिक्षणाच्या माध्यमांमध्ये परिवर्तन घडणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणातील ध्येय आणि दृष्‍टिकोन याबाबत विविध भागधारकांमध्ये जागरूकता आणि हितसंबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकारने चांगली कामगिरी बजावली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाचा मुलांना आणि तरुणांना खूप फायदा होईल. यामुळे रॉट बायपास करण्याची प्रवृत्ती नाहीशी होईल. नवीन शैक्षणिक धोरण आणण्याचा, येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्‍ज्वल करण्याचा हाच उद्देश आहे.

येत्या काळात बेरोजगारी हटवण्यात नवीन शिक्षण पद्धती निश्चितच यशस्वी होईल. नवीन शैक्षणिक धोरण मुले आणि तरुणांना नवीन मार्ग, प्रकाशाकडे घेऊन जाईल. तसेच रोजगाराभिमुख शिक्षण देईल.

या धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्थिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. नव्या धोरणात मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला असून शिक्षण मंत्रालयाने बहुचर्चित अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट हा उपक्रम आणला आहे.

टप्‍प्याटप्‍प्याने प्रशिक्षण

सध्या सत्तरीत विविध पातळीवर व टप्याटप्याने शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पालकांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे विविध स्तरावर पालकांमध्ये जनजागृती केली जातेय.

या धोरणाच्‍या अभ्यासाचे प्रशिक्षण सर्वांत आधी चांगल्या शिक्षकांना देण्यात आले होते. त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्यांकडून इतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पालकांनाही नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती देणारी कार्यशाळा आयोजित केली जात आहे.

सध्‍या पूर्व-प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका, पालक आदींचा या कार्यशाळेत समावेश आहे.

Sattari News
यावर्षी तब्बल 980 मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई..! राज्यातील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभाग ॲक्शन मोडमध्ये

नवीन शैक्षणिक धोरणापासून अजून काही पालक अनभिज्ञ!

यंदा जूनपासून सत्तरीतील सर्व शाळांमध्ये अभ्यासाबरोबर इतर उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक सण, प्रत्येक दिवसाचे महत्त्‍व सांगणे तसेच इतर उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. या उपक्रमात विद्यार्थी व पालकांची भूमिका महत्वाची आहे. कारण प्रत्येक मुलांच्‍या सर्वांगीण विकासाचा विचार करून मुलांना तयार केले जातेय. अशा उपक्रमांतून मुलांना उभारी मिळते. त्‍यांना शिक्षणाची आवड लागते.

"प्रत्येक मुलाचा प्राथमिक पाया मजबूत झाला तर आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. इयत्ता तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि संख्याशास्त्र शिकण्याची क्षमता सुधारण्यासाठी ‘निपुण भारत मिशन’, पहिलीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी तीन महिन्यांचा अभ्यासक्रम ‘विद्या प्रवेश’, शिक्षण अध्यायनासाठी ‘दीक्षा’ अॅप, माध्यमिक शिक्षकांसाठी ‘निष्ठा’ हा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे."

- भालचंद्र भावे, भागशिक्षणाधिकारी (सत्तरी)

"नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी ठाणे सरकारी माध्यमिक विद्यालयाची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खडू, फळ्‍याची जागा आता डिजिटल बोर्डने घेतली आहे."

"या नवीन शिक्षणाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. मुलांचे मोबाईलमुळे वाचन व लिखाण कमी कमी होत आहे. मात्र या धोरणामुळे मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. विकासाकडे ही वाटचाल सुरू आहे."

- काशिनाथ नाईक, मुख्याध्यापक, ठाणे विद्यालय

"नवीन शैक्षणिक धोरणाचा फायदा मुलांना चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यासाठी मुलांना वेळोवेळी त्यांच्या क्षमतेनुसार तयार करण्याचे आवाहन शिक्षकांपुढे आहे. रोजचे उपक्रम क्रमाक्रमाने घेताना प्रत्येकाचा हातभार मोलाचा असतो."

"आज मुलांना संधी आहे, कारण आमच्या वेळेस अशा प्रकारे शिक्षण दिले जात नव्हते. बाहेरचे ज्ञान नव्हते आता सोशल मीडिया तसेच इंटरनेटमुळे जग बदलत आहे. शिक्षण पद्धतीही बदलत चालली आहे."

- दत्ताराम मयेकर, ग्रामस्‍थ (सत्तरी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com