uorfi javed Dainik Gomantak
गोवा

Uorfi Javed in Goa Flight: मुंबई-गोवा फ्लाईटमध्ये तरूणांनी छेड काढल्याचा उर्फी जावेदचा आरोप

इकॉनॉमी क्लासने प्रवास करत असल्यावरून उडवली हुर्ये

Akshay Nirmale

Uorfi Javed in Mumbai Goa Flight: विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहणारी सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर आणि बिग बॉस ओटीटी मधील माजी कंटेस्टंट उर्फी जावेद पुन्हा चर्चेत आली आहे. उर्फी गोव्याला आली असून मुंबई-गोवा फ्लाईटच्या इकॉनॉमी क्लासमधून ती आली.

त्यावरून विमानातील काही तरूणांनी तिची हुर्ये उडवली. हे तरूण मद्यधुंद अवस्थेत होते आणि त्यांनी माझी छेड काढल्याचा आरोप उर्फीने केला आहे.

उर्फी सुट्टीसाठी गोव्याला आली आहे. तथापि, तिने विमानाच्या इकॉनॉमी क्लासमधून पहिल्यांदा प्रवास केल्याचे सांगितले जात आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, "काल फ्लाईटमधून मुंबई ते गोवा प्रवास करताना मला छेडछाडीला सामोरे जावे लागले.

या व्हिडिओतील पुरुष अश्लील बोलत होते, इव्हटीझिंग करत होते. नाव घेत होते. मी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याचे मित्र मद्यधुंद आहेत, असे सांगितले. मद्यधुंद असला म्हणजे महिलांशी गैरवर्तन करू शकता का? मी पब्लिक फिगर आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही." असे तिने म्हटले आहे.

आणखी एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये उर्फीने लिहिले आहे की, फ्लाईटमध्ये मुलांचा एक ग्रुप होता. त्यांनी मला ओळखताच ते माझी खिल्ली उडवू लागले. माझ्यावर आक्षेपार्ह कॉमेंटही केल्या. अयोग्य शब्द वापरले. अनेकदा माझ्या नावाने मोठ्याने हाका मारल्या.

हे तरूण मद्यधुंद अवस्थेत होते, त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप उर्फीने केला आहे. या प्रवाशांमुळे अस्वस्थ झाल्याचे तिने म्हटले आहे. चिडचिड झाली. इतर प्रवासी असल्याने शांत राहिले. विमानात दंगा करायचा नव्हता, असे तिने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT