Goencho Taxi Patrao Scheme Phase II Dainik Gomantak
गोवा

Goencho Taxi Patrao Scheme : ‘गोंयचो टॅक्सी पात्रांव’ योजनेअंतर्गत 100 लाभार्थ्यांना 'सीएनजी टॅक्सी'

पहिल्या फेजमध्ये मार्च महिन्यात 55 लाभार्थींना टॅक्सी सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

Rajat Sawant

Goencho Taxi Patrao Scheme Phase II : गोंयचो टॅक्सी पात्रांव योजनेच्या दुसऱ्या फेजमधील लाभार्थींना टॅक्सी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या या योजनेच्या दुसऱ्या फेजमध्ये 100 लाभार्थ्यांना सीएनजी टॅक्सी सुपूर्द करण्यात आल्या. तर पहिल्या फेजमध्ये मार्च महिन्यात 55 लाभार्थींना टॅक्सी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. 

यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो (Min. for Transport Mauvin Godinho), म्हापसाचे आमदार तथा उपसभापती जाेशुआ डिसोझा (Deputy Speaker and Mapusa MLA Joshua D’Souza), मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर (MLA Mormugao Sankalp Amonkar), वास्कोचे आमदार दाजी साळकर (MLA Vasco Krishna (Daji) Salkar) आदी उपस्थित होते.

गोंयचो टॅक्सी पात्रांव योजनेद्वारे योजनेतून एकही पैसा न देता लाभार्थीला टॅक्सी मिळणार आहे. तसेच ‘गोंयचो टॅक्सी पात्रांव’ योजनेत दिल्या जाणाऱ्या टॅक्सी सीएनजीवर चालणार असून टॅक्सी व्यवसाय पर्यावरणपूरक होईल, असे सरकारचे धोरण आहे.

ज्यांच्याकडे सायकलही नव्हती त्यांच्याकडे आता टॅक्सी पत्राव योजनेतून उदरनिर्वाहासाठी टॅक्सी आहे. गोवा माईल्स ऑपरेटर महिन्याला 80,000 रुपये कमावत आहेत असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT