गोव्यात भिक्षेकऱ्यांचे रॅकेट? महिला, लहान मुलांवर जबरदस्ती; दोन वर्षात भिक्षेकऱ्यांच्या संख्येत वाढ

हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी याबाबत प्रश्न विचारला होता, त्याला मुख्यमंत्री सावंत यांनी लेखी उत्तर दिले आहे.
Begging Cases In Goa Are Rising:
Begging Cases In Goa Are Rising:Dainik Gomantak
Published on
Updated on

Begging Cases In Goa Are Rising: गोव्यात मागील दोन वर्षात भिक्षेकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भिक्षेकरी कायद्याअंतर्गत राज्यात मागील अडीच वर्षात 220 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

2021 मध्ये 16, 2022 मध्ये 101 आणि 2023 सालात 30 जूनपर्यंत 103 गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिवेशन काळात दिली.

हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी याबाबत प्रश्न विचारला होता, त्याला मुख्यमंत्री सावंत यांनी लेखी उत्तर दिले आहे.

कार्लुस फेरेरा आणि फातोर्डा सिग्नल परिसरात होणाऱ्या भिक्षेकऱ्यांच्या आणि हॉकर्स याच्याबाबत प्रश्न उपस्थित करत, त्याला आळा घालण्याची मागणी केली होती.

दरम्यान, 2022 मध्ये फातोर्डा येथील ओल्ड मार्केट सिग्नलजवळ भीख मागणाऱ्या दोन अल्पवयीन मुले आणि मुलींची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी मेरशी येथील अपना घरात करण्यात आली आहे.

तसेच, दोन पुरूष आणि तीन महिलांविरोधात भिक्षेकरी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांना मडगाव न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. अशी माहिती सावंत यांनी उत्तरात दिली आहे.

Begging Cases In Goa Are Rising:
Revolutionary Goans: दीड कोटी खर्चूनही पेडणे पालिका क्षेत्रातील स्मशानभूमीची दुरवस्था कायम

राज्यात महिला, लहान मुले आणि दिव्यांगाना भीख मागण्यासाठी जबरदस्ती करत असून, रॅकेट कार्यरत असल्याचे मुद्याकडे फेरेरा यांनी लक्ष वेधले. तसेच, हे रॅकेट उद्धवस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

अशाप्रकारचा एक गुन्हा म्हापसा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून, दोघांना अटक केली आहे. लहान मुलांना भीख मागण्यास भाग पाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही केस सध्या न्यायालयात असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दरम्यान, राज्यात भिक्षेकरी कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी केली जात आहे. पण, याबाबत संघटीत किंवा रॅकेट कार्यरत असल्याची माहिती उजेडात आली नसल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com