Rama Kankonkar Assault Case Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar Assault: जोपर्यंत खऱ्या सूत्रधाराला अटक होत नाही, तोपर्यंत पोलिसांवर विश्वास नाही - रामा काणकोणकर

Rama Kankonkar Assault Case: ‘आपल्या आमदाराचे नाव बदनाम करतो’ असे म्हणून आपणास मारहाण करणाऱ्या संशयितांबरोबर कोणत्या आमदाराचे संबंध आहेत, हे शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे.

Sameer Amunekar

‘आपल्या आमदाराचे नाव बदनाम करतो’ असे म्हणून आपणास मारहाण करणाऱ्या संशयितांबरोबर कोणत्या आमदाराचे संबंध आहेत, हे शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे. त्याशिवाय आपला जबाब फोडला जातो आणि पोलिसांना आपणास मारहाण करण्यासाठी वापरलेली हत्यारे सापडत नाहीत, यावरून पोलिसांच्या तपासकामाविषयी संशय व्यक्त होत आहे.

आपली कोणाशी वैयक्तिक दुश्मनी नाही, आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणाचा तपास पोलिसांकडे नको, आत्तापर्यंत पोलिसांची भूमिका पाहिल्यास त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी केला आहे.

गोमेकॉतून उपचार घेतल्यानंतर त्यांना आज सोडण्यात आले, गोमेकॉबाहेर प्रसारमाध्यमांकडे त्यांनी आपले मत मांडले. रामा म्हणाले, राज्यातील प्रशासकीय पद्धतीवर आपला विश्वास राहिलेला नाही, जो विश्वास आहे तो केवळ येथील जनतेवर आहे. मारहाण प्रकरणी ज्यांना पकडण्यात आले आहे, ती लोकांची दिशाभूल आहे.

जोपर्यंत आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना अटक होत नाही, त्यावरून पोलिसांवर अजिबात विश्वास राहिला नाही, असे त्याने सांगितले. १८ सप्टेंबर रोजी पणजीतील करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर दुपारी हल्ला झाला. त्यात ते गंभीर जमखी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांनी पणजीत चक्का जाम आंदोलनही केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ गोमेकॉत जाऊन रामा काणकोणकर यांच्या आरोग्याची विचारपूस केली.

याप्रकरणी मुख्य संशयित म्हणून जेनेटोसह त्याच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तोपर्यंत रामा काणकोणकर यांच्या जबाबाची प्रत व्हायरल झाली आणि त्यात दुसऱ्याच व्यक्तीचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणानंतर रामा काणकोणकर यांच्या पत्नीने पत्रकार परिषद घेत रामाचा जबाब फुटल्याचा आरोप केला, त्यामागे पोलिसांवर संशय व्यक्त केला होता.

संशयितांचे कोणत्या आमदाराशी संबंध?

आपणास मारहाण करणाऱ्या संशयितांबरोबर कोणत्या आमदाराचे संबंध आहेत हे पोलिसांनी शोधून काढावे. मी दिलेल्या जबाब फोडण्यात आला आणि तो व्हायरल झाला. त्यामुळे आता आपला पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आपल्यावर मारहाण करणाऱ्या संशयितांचे कोणत्या आमदाराशी संबंध आहेत ते शोधून काढावे, असे रामा काणकोणकर यांनी सांगितले.

चोवीस दिवसांनंतर सोडले घरी

सप्टेंबर महिन्यातील १८ तारखेला हल्ला झाल्यानंतर गोमेकॉत उपचारासाठी दाखल के लेल्या रामा काणकोणकर यांचा तेथील मुक्काम २४ दिवसांचा राहिला. त्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याने शनिवारी त्यांना तेथील गोमेकॉच्या वैद्यकीय प्रशासनाने डिस्चार्ज दिला.

या काळात त्यांना मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांनी गोमेकॉत जाऊन रामा काणकोणकर यांची विचारपूस के ली. सायंकाळी त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर व्हिलचेअरवरून ते बाहेर पडले. यावेळी त्यांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कौटुंबिक वादांवरील धोरण स्वागतार्ह, पण 'नोकरशाहीचा अडथळा नको' - आपची मागणी

Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

Mapusa Crime: 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ब्लॅकमेल करून पैसे लुटल्याची धक्कादायक घटना

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

SCROLL FOR NEXT