Goa Crime: 'माझ्या मुलाचा मृत्यू घातपातातून, आपल्याही जीवाला धोका'! चांदर येथील वृद्ध महिलेचा दावा; FIR नोंदवण्याची केली मागणी

Girdoli Chandor: पार्श्वभूमी पााहता हा मृत्‍यू अनैसर्गिक नसून ताे घातपाताचाच प्रकार आहे आणि त्‍यामुळे आपल्‍या जीवालाही धोका आहे, असे या महिलेने आपल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दोन महिन्‍यांपूर्वी आपला मुलगा आनाक्‍लेत बार्रेटो याला आलेला मृत्‍यू संशयास्‍पद असून त्‍याच्‍या मृत्‍यूमागे घातपाताचा संशय असल्‍याचे नमूद करून यासंबंधी संशयितांवर लवकरात लवकर ‘एफआयआर’ दाखल करून या मृत्‍यू प्रकरणाची फेरचौकशी करा, अशी मागणी करणारे एक निवेदन गिरदाेली-चांदर येथील तेवोदोलिंदा बार्रेटो या वृद्ध ‍महिलेने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

१२ ऑगस्‍ट रोजी आनाक्‍लेत याला आपल्‍या घरी मृत्‍यू आला होता. माशाच्‍या एक्‍वेरियमवर पडून पायाला दुखापत झाल्‍याने झालेल्‍या रक्‍तस्रावातून त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे नमूद करून या प्रकरणाची मायणा-कुडतरी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून नोंद केली होती.

मात्र, अशा किरकोळ जखमेमुळे काेणी मरू शकत नाही. आपण अमेरिकेत एका लग्‍न समारंभासाठी गेले असताना हा मृत्‍यू झाला आहे. आपल्‍या मुलाचे सुनेसोबत तणावग्रस्‍त संबंध होते. त्‍यामुळे त्‍याचा मानसिक छळ होत होता.

Crime News
Goa Crime: वादावादीतून चेहऱ्यावर, नाकावर बुक्क्यांनी मारहाण; अपुरे पुरावे आणि साक्षीदार अनुपस्थित; आरोपीची झाली निर्दोष सुटका

ही सारी पार्श्वभूमी पााहता हा मृत्‍यू नैसर्गिक नसून ताे घातपाताचाच प्रकार आहे आणि त्‍यामुळे आपल्‍या जीवालाही धोका आहे, असे या महिलेने आपल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

Crime News
Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

पोलिसांकडून टाळाटाळ

बार्रेटो यांनी १५ सप्‍टेंबर रोजी यासंदर्भात मायणा-कुडतरी पाेलिसांत तक्रार देऊन या मृत्‍यू प्रकरणात ‘एफआयआर’ नाेंदवा, अशी मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी हा गुन्‍हा नोंद न केल्‍यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्‍या १७५ (३) कलमाखाली बार्रेटो यांनी पाेलिस अधीक्षकांकडे दाद मागितली आहे. यासंदर्भात गुन्‍हा नोंद करून संबंधितांची चौकशी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Samuel death mystery update
Goa Medical College Kerala student death
Mapusa Youth Suicide
Bison Attack Death Betoda Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com