Goa National Highways Dainik Gomantak
गोवा

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कमालीची नियोजनशून्यता

विजय भिके : कंत्राटदाराकडून दुय्‍यम दर्जाचे बांधकाम

दैनिक गोमन्तक

म्हापसा : पर्वरी ते पत्रादेवीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highways) बांधकामात केंद्र व राज्य सरकारकडून (State Government) तसेच कंत्राटदारांकडूनही कमालीची नियोजनशून्यता दिसून येते, अशी टीका काँग्रेसचे (Congress) उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी केली आहे. गोवाभर नेमकी हीच परिस्थिती असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रतिनिधीशी बोलताना श्री. भिके पुढे म्हणाले, करासवाडा ते बांबोळी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे कंत्राट हे सुमारे 850 कोटी रुपये, तर पत्रादेवी ते करासवाडा प्रकल्पाचे काम सुमारे 630 कोटी रुपये मूल्याचे आहे.

कंत्राटदाराकडून हे बांधकाम अतिशय नीच दर्जाचे होत असून, काम करण्याच्या बाबतीत हलगर्जीपणाही दिसून येतो व त्याला केवळ संबंधित कंत्राटदारच नव्हे, तर सरकारही तेवढेच जबाबदार आहे. जनतेचा पैसा सत्कारणी न लावता अशा पद्धतीने उधळपट्टी केली जात आहे.

या महामार्गाच्या कामामुळे कित्येक झाडे तोडण्यात आली असून, पर्यावरणाला पूरक असलेल्या खारफुटीच्या झाडांवरही परिणाम झालेला आहे. त्याशिवाय कित्येक जलस्रोत व जलसाठेही नामशेष करून टाकण्यात आले आहेत, असा दावाही श्री. भिके यांनी केला.

निरपराध व्यक्तींचे बळी

विजय भिके म्हणाले, महामार्गाचे काम करणाऱ्या ‘एमव्हीआर इन्फ्रा’ कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे व महामार्गावरील खड्ड्यांमुळे कित्येक निरपराध व्यक्तींचे बळी गेले आहेत. महामार्गावरून जाणारे प्रवासी व वाहनचालकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेले वाहतूक आणि रस्ता सुरक्षेसंदर्भातील सूचनाफलक उभारण्यात शासकीय प्रशासन अपयशी ठरले आहे. यातून दिसणारा सरकारचा निष्काळजीपणा नेहमीचाच झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

खरी कुजबुज: सुभाष यांचा कुंकळ्ळीत वाढला वावर!

VIDEO: "विराटने आणि मी आधीच ठरवलं होतं..." रोहित शर्माचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा, पाहा नेमकं काय म्हणाला 'हिटमॅन'

BJP MGP Alliance: फोंड्याचा निर्णय चर्चा करूनच, सद्यस्थितीत भाजप–मगो युती गरजेची- दामू नाईक

SCROLL FOR NEXT