Gold Jewellery Theft in Goa Dainik Gomantak
गोवा

लग्नाला आलेल्या पर्यटक जोडप्याचे 5.56 लाखांचे दागिने लंपास

बाणावलीतील मेरिएट हॉटेलमधील लग्नसमारंभावेळी चोरीची घटना; पोलीस तपास सुरु

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यात लग्न समारंभासाठी आलेल्या हरियाणा येथील एका पर्यटक जोडप्यांचे दागिने चोरीला गेले आहे. तब्बल साडे पाच लाखांचे दागिने बाणावली येथील पंच तारांकित हॉटेलमधून चोरीला जाण्याची घटना काल मंगळवारी रात्री घडली आहे.

बाणावली येथील मेरिएट हॉटेलमध्ये हा लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी फरीदाबाद येथील नवनीत शर्मा हे आपल्या पत्नीसह आले होते. त्यांनी आपल्या खोलीत सोन्याचे दागिने ठेवले होते. ती दोघे रात्री 9 च्या सुमारास लग्न समारंभाला जाऊन रात्री 10 वाजण्याच्या सुमारास परत आले असता त्यांच्या खोलीत चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरटा खोलीचे स्लाईडिंग दरवाजा उघडून आत येऊन दागिने घेऊन फरार झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी कोलवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हॉटेलच्या सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तसंच अजून कुणाचे दागिने चोरीला गेलेत का याचाही तपास पोलिस करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT