Chimbel Dainik Gomantak
गोवा

Chimbel Protest: 'चिंबल' प्रश्नाचे काय होणार? राज्याचे लक्ष लागून; सरकार 2 दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता

Chimbel Unity Mall: प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्पाविरोधातील चिंबलवासीयांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्पाविरोधातील चिंबलवासीयांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत राज्य सरकारचा निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्‍यान, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘गाकुवेध’ संघटनेने उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्‍या गुरुवारी मेरशी चौकात आंदोलनकर्त्यांची भेट घेतल्यानंतर हे दोन्ही प्रकल्प केंद्र सरकारचे असल्याने केंद्राशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.

तसेच जिल्हा सत्र न्यायालयाने बांधकाम परवाना, पंचायत उपसंचालक आणि गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश रद्दबातल ठरविले आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपोषणाचा २२ वा दिवस

चिंबल ग्रामस्थांचे कदंब पठारावर सुरू असलेल्‍या उपोषणाला २२ दिवस झाले आहेत. या आंदोलनाला विविध गावांतील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, संघटना, विरोधी पक्ष आणि काही विरोधी आमदारांचा पाठिंबा मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT