Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Mhadei River: 'गोव्यासाठी पक्ष सोडून लढा देऊया'! ‘म्हादई’साठी एकत्र येण्याचे विरियातोंचे आवाहन

Viriato Fernandes: खासदार विरियातो म्हणाले, लोकसभेच्या अधिवेशनाच्या काळात आपण आठ महिन्यांत गोव्याचे आणि देशाच्या हिताचे विषय मांडले.

Sameer Panditrao

पणजी: म्हादईसारख्या प्रश्नावर कर्नाटकातील खासदार पक्ष, मतभेद विसरून एकत्र येतात. त्यामुळे गोव्यातील भाजपचे लोकसभेचे खासदार श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोव्यासाठी पक्ष सोडून एकत्र येऊन लढा देऊया, असे आवाहन दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केले.

पत्रकार परिषदेस प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास खलप, दक्षिण गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांची उपस्थिती होती. खासदार विरियातो म्हणाले, लोकसभेच्या अधिवेशनाच्या काळात आपण आठ महिन्यांत गोव्याचे आणि देशाच्या हिताचे विषय मांडले.

सरकार पुरेसे गंभीर

म्‍हादई नदीचे पाणी कर्नाटकाने पळवू नये यासाठी सरकार पुरेसे गंभीर आहे असे मत मुख्यमंत्री सावंत यांनी काही दिवसांपूर्वी मांडले होते. म्हादईविषयक खटले सर्वोच्च न्यायालयात कधी सुनावणीस येणार याविषयी राज्य सरकारकडे निश्चित माहिती नाही. प्रवाह अधिकारीणीची बैठकही महिनाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे.असे असले तरी राज्य सरकारला याप्रश्नी आपली बाजू भक्कम आहे, असे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT