Mhadei Water Dispute: म्‍हादईप्रश्‍‍नी सपशेल अपयश! केंद्राकडे भाजपचेच राज्य सरकार वेळ मागू शकत नाही, युरींचा टोला

Yuri Alemao: वारंवार मागणी करूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेऊ शकत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज पर्वरी येथे केली.

Yuri Alemao On Mhadei River Dispute

पणजी: म्हादई नदीचा प्रश्‍‍न आता राज्य सरकारसाठी प्राधान्याचा राहिलेला नाही. वारंवार मागणी करूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेऊ शकत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज पर्वरी येथे केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनापासून हा विषय चर्चेत आला आहे. कर्नाटक सरकार गोव्‍याचे पाणी पळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. केंद्रातील भाजप सरकारकडे हा विषय मांडण्यासाठी राज्यातील भाजपचेच सरकार वेळ मिळवू शकत नाही. यावरून सरकारला या प्रकरणी किती गांभीर्य आहे हे दिसून येते, असा टोलाही त्‍यांनी हाणला.

या विषयावर आवाज उठवण्यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत. दिल्लीत सरकारने शिष्टमंडळ नेल्यास त्यात आम्ही सहभागी होऊ असे सांगून युरी म्हणाले, कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या अहवालास केंद्र सरकारने दिलेली मान्यता मागे घ्यायला लावली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com