New Zuari Bridge |Nitin Gadkari
New Zuari Bridge |Nitin Gadkari  Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली नवीन झुआरी पुलाची पाहणी...

Akshay Nirmale

New Zuari Bridge: उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या नवीन झुआरी पुलाचे आज गुरूवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी उद्घाटन होत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे. लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम सायंकाळी ७ नंतर सुरू होणार आहे. तथापि, दुपारीच मंत्री गडकरी यांचे गोव्यात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी या पुलावर फेरफटका मारत पुलाची पाहणी केली.

गडकरींच्या केलेल्या या पुलाच्या पाहणीचे फोटोज गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तेच ट्विट गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील ट्विटरवरून शेअर केले आहे. या नव्या पुलाच्या पुर्ततेमध्ये सर्वाधिक वाटा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा असल्याचे मानले जाते. पर्रीकरांच्या शब्दांखातर या संपुर्ण प्रकल्पासाठी नितीन गडकरी यांनी दोन हजार कोटींचा निधी सहज मंजूर केला होता.

अटल सेतूनंतर झुआरी पुल सारखा गोव्यातील मोठा प्रकल्प नितीन गडकरी यांच्यामुळचे मार्गी लागला. या पुलामुळे गोव्याच्या विकासात भरच पडणार आहे. अवजड वाहने जाण्यासाठीची मोठी सोय या पुलामुळे झाली आहे. गेली कित्येक वर्षे येथील अवजड वाहने फोंडा, बोरी भागातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

Lairai jatra: लईराई देवीच्या जत्रोत्सवादरम्यान तरुणीकडून वादग्रस्त पोस्ट; भाविकांची पोलिस ठाण्यावर धडक

Goa Today's Live News: मांडवीखाडी वेंगुर्ला येथे म्हापशातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

CM Pramod Sawant: 'साखळीत येत्या 5 वर्षांत 25 हजार लिटर दूध उत्पादनाचे ध्येय'

Illegal Constructions: किनारपट्टी लगतची बेकायदा बांधकामे तातडीने पाडा; दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

SCROLL FOR NEXT