Goa Taxi App : टॅक्सी ॲपबाबत राजकारण करु नका अन्यथा... मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना ईशारा

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सीचा वाद अद्यापही कायम
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पेडण्यातील टॅक्सी मालक गोवा टॅक्सी ॲपमध्ये सहभागी होण्यास तयार आहेत. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी सुविधेत आडकाठी आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असा ईशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

CM Pramod Sawant
New Zuari Bridge : झुआरीवरील 'त्या' स्टॉल विरोधात पोलिसांत तक्रार; बड्या भाजप नेत्याचे नाव आले समोर

पेडण्यातील टॅक्सी वादावर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सीचा वाद अद्यापही कायम आहे. यावर आज पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच यांना घेऊन पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समवेत बैठक केली. या बैठकीला टॅक्सी असोसिएशनचे सदस्य उपस्थित राहणार होते मात्र या बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांना मज्जाव केल्याने असोसिएशनच्या सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे बैठक असोसिएशन विना झाली.

CM Pramod Sawant
Colvale Fire: 350 बंब संपले तरी आग विझता विझेना, 28 तासानंतरही भंगारअड्डा धुमसतोय

याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ॲपच्या अंमलबजावणी बाबत काही लोक राजकारण करत आहेत यापुढे हे सहन केले जाणार नाही. आणि अशा प्रकारचे अडथळे आणणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा ईशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्र्यांनी बैठकीला उपस्थित असलेले जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच यांना या ॲपसंदर्भात माहिती देऊन हा ॲप पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांसाठी कसा लाभदायक आहे हे सांगितले आणि तुमच्या परिसरातील टॅक्सीचालकांना ही माहिती द्या अशी विनंती वजा सूचना केली. यावर आता २ जानेवारीला पुन्हा आढावा बैठक होईल. आणि त्यावेळी अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पर्यटन मंत्री खंवटे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com