New Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge: ठरलं! झुआरी पुलाचे 'या' तारखेला होणार उद्घाटन, केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

राज्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल सर्वांत महत्त्वाचा आहे.

Pramod Yadav

झुआरी नदीवरील (New Zuari Bridge) नव्याने उभारलेला पुल डिसेंबर संपण्यापूर्वी नागरीकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल (PWD Minister Nilesh Cabral) यांनी दिली होती. दरम्यान, पुलाच्या चारपदरी महामार्गाचे येत्या चार दिवसांत केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतुकीचा बोजा कमी होणार आहे. त्याशिवाय या महामार्गावरील वाहतूकही सुरळीत होणार आहे. राज्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल सर्वांत महत्त्वाचा आहे.

नाताळ व नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक अपेक्षित असल्याने व होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे नव्या झुआरी पुलाचा एकमार्ग नाताळपूर्वी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. काही दिवसांपुर्वी सार्वजनीक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी नवीन झुवारी पुलाची पाहणी केली होती. 

केव्हा होणार उद्धाटन?

झुआरी पुलाच्या चारपदरी महामार्गाचे 26 डिसेंबर 2022 रोजी उद्धाटन केले जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा या पुलाचे उद्धाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली मिळाली आहे.

नवा झुआरी पुलाचा एकमार्ग खुला झाल्‍यास तो पणजीत येणाऱ्या वाहांनासाठी असेल, तर जुना झुआरी पूल हा वास्को व मडगावकडे जाणाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. या पुलावरून अवजड वाहनेही जातील मात्र नव्या पुलावरून या वाहनांना जाण्यास सध्या तात्पुरती बंदी ठेवण्याचा विचार संंबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT