GoaLok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपच; नारायण राणे अ‍ॅक्शन मोडमध्ये

नारायण राणे यांच्याकडे दक्षिण गोव्याची जबाबदारी

दैनिक गोमन्तक

Goa Election: भाजपने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून देशातील 70 केंद्रीयमंत्र्यांना प्रत्येकी दोन या पद्धतीने 140 मतदारसंघांची जबाबदारी देऊन त्या त्या मतदारसंघात पाठविण्यात आले आहे. हे 140 ही मतदारसंघ 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जिंकता आले नव्हते. म्हणून या मतदारसंघाची विशेष तयारी करणे सुरू केले आहे.

(Union Minister Narayan Rane claims BJP will win South Goa Lok Sabha in 2024)

केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे दक्षिण गोव्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी आज या मतदारसंघाचा आढावा घेत आपण हा मतदारसंघ जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीयमंत्री राणे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. आता हे टार्गेट वाढवून 403 करण्यात आले आहे. त्या निवडणुकीमध्ये भाजपने ज्या 140 जागा गमावल्या होत्या. सध्या त्या 140 जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्यापैकी शंभर जागा जिंकण्याचा भाजपचा इरादा आहे.

म्हणून या पराभूत झालेल्या 140 जागांची जबाबदारी केंद्रातील प्रत्येक मंत्र्यांना दोन या पद्धतीने देण्यात आली आहे. माझ्याकडे दक्षिण गोव्याबरोबरच दक्षिण मुंबईची जबाबदारी सोपविली असून या दोन्ही जागा भाजप जिंकेल असा मला विश्वास आहे.

गोव्याच्या जागेबाबत बोलताना राणे म्हणाले सध्या दक्षिण गोवा मतदारसंघातील 20 पैकी 12 आमदार आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे हा मतदार संघ आम्ही जिंकल्यात जमा आहे. मात्र युद्धात आणि राजकारणात कसर सोडून चालत नाही. म्हणूनच आम्ही या मतदारसंघाची आतापासून तयारी सुरू केली आहे.

आम्ही ग्रामपंचायत ते जिल्हा पंचायत गटापर्यंत केंद्र सरकारने केलेली विकास कामे घेऊन जाणार असून त्या आधारेच आम्ही मते मागणार आहोत. याशिवाय राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे ते उत्तम काम करत असून त्याचा फायदाही लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आम्हाला होईल याचा मला आत्मविश्वास आहे.

200 कोटींचे एमएसएमई सेंटर उभारणार

केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याच्यावतीने राज्यात उद्योजकांना प्रशिक्षण देणारे 200 कोटी रुपये खर्चून एमएसएमई सेंटर उभारण्यात येणार असून तसा प्रस्ताव पाठवण्यास राज्य सरकारला सांगण्यात आला आहे. ते झाल्यास राज्यातील युवकांना उद्योगाची प्रेरणा मिळेल आणि प्रशिक्षणही, असे केंद्रीयमंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT