Mineral Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गोवा सरकारला फटकारले, म्हणाले...

गोवा खनिज धोरण 2013 मधील मुद्द्यांनुसार आपले कर्तव्य बजावण्यात संचालनालय अपयशी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने गोवा सरकारला फटकारले आहे. मंत्रालयाच्या बंगळुरू येथील प्रादेशिक उच्चाधिकार समितीची बैठक 20 जानेवारीला झाली.

खनिज धोरण 2013 मधील मुद्द्यांनुसार आपले कर्तव्य बजावण्यात संचालनालय अपयशी ठरल्याने सरकारला फटकारले.

समितीच्या 17 फेब्रुवारी 2022 झालेल्या बैठकीत राज्यातील वनक्षेत्रात असलेल्या एकूण डंपची संख्या, निकाली काढण्यात आलेले डंप्स यांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते.

वनक्षेत्रातील डंप किंवा थेट नाकारण्यात आलेल्या खनिजाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा अवलंब केला याची माहिती देण्याचेही आदेश समितीने राज्य सरकारला दिले होते.

गोवा खनिज धोरण 2013 मध्ये सर्व प्रक्रिया नमूद असताना त्यावर कार्यवाही केलेली नाही, आणि निष्कर्ष सादर करण्यात आलेले नाही, असे समितीने म्हटले आहे.

लीज क्षेत्राबाहेर खासगी आणि सरकारी जमिनीत असलेल्या खनिज डंप किंवा नाकारलेल्या लोहखनिजाचा दर्जा, मूल्यमापन करण्याचे वैधानिक कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 20 जानेवारीला झालेल्या बैठकीत गोव्यातील वन खाते, खाण आणि भूगर्भ संचालनालय यांना फटकारले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT