Mahadayi Water Dispute : गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या म्हादईच्या लढ्याने आता काही दिवसांपासून वेगळेच वळण घेतले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानानंतर आता गोव्यात त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
एकीकडे गोवा सरकार केंद्राने कर्नाटकच्या डीपीआरला दिलेली मंजूरी रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे विरोधक यात सरकारला धारेवर धरत म्हादईसाठी आक्रमक होतात दिसत आहेत. (Karnataka acts like Duryodhana from Mahabharat says Dayanand mandrekar)
माजी आमदार तथा मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी म्हादईप्रश्नी विधान करत कर्नाटकला महाभारतातील दुर्योधनाची उपमा दिली आहे. अशी आख्यायिका आहे की, महाभारतात धर्मराजाला हस्थिनापुरातील सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा देणार नाही असे दुर्योधनाने म्हटले होते.
यावर दयानंद मांद्रेकर यांनी कर्नाटकची तुलना महाभारतातील दुर्योधनाशी केली आहे; ते म्हणाले की, खरे तर आम्ही गोवा आणि कर्नाटक शेजारी आहोत.
कोणालाही शेजाऱ्यांशी कटुता नको असते; पण कर्नाटक दुर्योधनासारखे वागत आहे. ते म्हणताहेत की ते सुईच्या टोकाइतकी जमीनही कोणाला देणार नाहीत.
याच विषयावर एलिना साल्ढाणा यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, मी एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हादईवरील वक्तव्यादरम्यान गोवेकरांना त्यांच्या जलस्रोतांची काळजी नाही असे म्हणताना दिसत आहेत.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गोवेकर सांडपाणी आणि कचरा नदीच्या पाण्यात टाकतात. तर मला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना याबद्दल सांगावेसे वाटते की गोव्यातील जलस्रोत प्रदूषित करणारी ही सर्व कृत्ये परप्रांतीयांनी केली आहेत; यात गोवेकरांचा सहभाग नाही.
तर दुसरीकडे, कर्नाटकच्या एकंदरीत गोष्टी बघता, आता गोवा सरकारने, ‘गोवा म्हादईचे पाणी वळवू देणार नाही’, असा संदेश देणार्या जाहिराती प्रसिद्ध करायला सुरुवात करायला हवी.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील सर्व नद्या जोडण्याची योजना आखली होती; मात्र या योजनेला विरोध झाला.
त्यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली ज्यातर्फे प्रकल्पाविरुद्ध अहवाल देण्यात आला. आम्हाला या अहवालाची प्रत मिळाली पाहिजे, असे वक्तव्य माजी खासदार जॉन फर्नांडिस यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.