Union Budget 2024 Dainik Gomantak
गोवा

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प देशाला प्रगतिपथावर नेणारा :दयानंद सोपटे

Union Budget 2024 : डबल इंजिन’ सरकारचे फायदे दिसताहेत! भाजपच्या डबल इंजिन सरकारने घेतलेल्या निर्णयांचे फायदे आता गोव्यातील जनतेला दिसून येत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने गरीब, युवा, महिला आणि शेतकरी यांना अधिक बळकटी मिळावी, या हेतूने अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून देशाला प्रगतिपथावर नेणारा हा अर्थसंकल्प असल्याने केंद्र सरकारचे अभिनंदन करत असल्याचे भाजप नेते दयानंद सोपटे यांनी सांगितले.

पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी गिरीराज पै वेर्णेकर आणि जयराम खोलकर उपस्थित होते. दरम्यान सोपटे म्हणाले, आदिवासी समाजाच्या विकासाठी, महिलांचे जीवनमान बदलावे, युवकांना शिक्षण, रोजगार मिळावा यासाठी भरीव तरतूद केली आहे. जयराम खोलकर म्हणाले,यंदाच्या अर्थसंकल्पात करांमध्ये बदल केले आहे. कामगार वर्गासाठीही भरीव काम केले आहे.

डबल इंजिन’ सरकारचे फायदे दिसताहेत!

‘भाजपच्या डबल इंजिन सरकारने घेतलेल्या निर्णयांचे फायदे आता गोव्यातील जनतेला दिसून येत आहेत. भाजपचे राज्यसभा खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल राज्यसभेत ‘एसटी’ समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्यसभेत उत्तमरित्या मांडला.

परंतु दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात गोव्यातील महत्त्वाच्या विषयांना बगल देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गिरीराज पै वेर्णेकर यांनी केला. तसेच त्यांनी केंद्र सरकारने राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासंंबंधीचे परिपत्रक जारी केल्याबद्दल अभिनंदनही यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT