Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: म्हापशात खळबळ! कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; घातपात की नैसर्गिक मृत्यू? तपास सुरू

Mapusa Crime: उत्तर गोव्यातील गजबजलेले शहर असलेल्या म्हापसा येथील मारोड भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

Sameer Amunekar

म्हापसा: उत्तर गोव्यातील गजबजलेले शहर असलेल्या म्हापसा येथील मारोड भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह कुजलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

मारोड येथील एका निर्जन ठिकाणी हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी खराब झाली होती की, त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत व्यक्तीचे वय ४० ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन तो बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे की त्यामागे काही घातपात आहे, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारे सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने स्थानिकांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मारोड परिसरात अनेकदा निराश्रित आणि भिक्षेकरी लोकांचा वावर असतो. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा आणि मृताची ओळख पटवून त्याच्या वारसांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT