Sitakant Bhosale Dainik Gomantak
गोवा

माऊलींचे नाव घेत 'ते' झाले वैकुंठात विलीन, देवकीकृष्ण वारकरी मंडळाच्या वारीत घडली घटना

माशेलचे सीताकांत वारीमध्येच ‘वैकुंठवासी’ : हलकर्णीजवळ इस्पितळाच्या दारातच घेतला अखेरचा श्वास

गोमन्तक डिजिटल टीम

Sitakant Bhosale पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन सीताकांत दशरथ भोसले (66) या माशेलातील वारकऱ्याने प्रवास सुरू केला होता. त्यांच्या तोंडी होते ते फक्त विठुमाऊलीचे नाम.

पण बुधवारी (ता.14) सकाळी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आणि हा त्यांचा पंढरीचा प्रवास ‘वैकुंठा’त विलीन झाला.

देवकीकृष्ण वारकरी मंडळाची वारी रविवारी माशेलहून निघाली. मंगळवारपर्यंत ७२ किमीचा प्रवास केल्यानंतर बुधवारी (ता.१४) सकाळी पाटणे येथून वारी पुढे निघाली.

या वारीत सहभागी झालेले सीताकांत दशरथ भोसले (६६) यांना अचानक अत्यवस्थ वाटू लागल्यामुळे ते थांबले. त्यावेळी इतर वारकऱ्यांनी त्यांना चारचाकीतून चंदगड तालुक्यातील हलकर्णीजवळच्या इस्पितळात उपचारासाठी नेले; पण इस्पितळाच्या दारातच त्यांनी विठुमाऊलीच्या नामस्मरणात अखेरचा श्वास घेतला.

त्यांचे गायन, वादन नियमित सुरू होते. त्यांनी विविध अभंग गायिले, विठूचा मोठा गजर केला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, भाऊ, दोन मुलगे, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

खास रुग्णवाहिकेची व्यवस्था

वारकरी सीताकांत यांच्या अकस्मात निधनामुळे वारकऱ्यांवर संकट कोसळले. मृतदेह गोव्यात पोहोचविण्यासाठी खास रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. मृतदेह माशेलात पोहोचल्यानंतर काही काळ खांडोळा व त्यानंतर त्यांच्या मूळ घरी आखाडा-सांतइस्तेव येथे अंत्यदर्शनासाठी ठेवला. त्यानंतर नार्वे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सलग दहा वर्षे वारी

सीताकांत भोसले हे इंडियन ओव्हरसीस बॅंकेतून ते सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर भजन, पखवाज वादन, समाजिक उपक्रमात नेहमीच ते सहभागी असायचे.

गेल्या दहा वर्षांपासून ते नियमित वारीत सहभागी असायचे आणि यंदा विठूच्या नामस्मरणातच योगीनी एकादशीलाच त्यांची प्राणज्योत मालवली.

तातडीचे प्रयत्न : वारीचे व्यवस्थापक वारकरी संजय नावेलकर वारीतील प्रत्येकावर लक्ष ठेवून असतात. ते सकाळी नुकतेच काही साहित्य घेऊन आले, त्यावेळी त्यांनी कठड्यावर बसलेल्या अस्वस्थ सीताकांत यांची विचारपूस केली.

तेव्हा अस्वस्थ वाटत असल्याचे त्यांनी सांगताच तातडीने त्यांना इस्पितळात रवाना केले. पण हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांनी इस्पितळाच्या दारातच प्राण सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT