Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak

Mapusa News: उत्तर गोव्यात सुवर्णकारांचे आंदोलन सुरूच, तीन दुकाने ठेवणार बंद; महाराष्ट्र पोलिसांच्या छळणुकीचा निषेध

तीन दिवस दुकाने बंद: परराज्यातील पोलिसांकडून छळणूक
Published on

Mapusa News परराज्यातील पोलिसांकडून होणाऱ्या छळणुकीच्या निषेधार्थ उत्तर गोव्यातील सुवर्णकारागिरांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. याचाच भाग म्हणून या कारागिरांनी तीन दिवस स्वतःची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अखिल गोवा दैवज्ञ सुवर्णकारागिर संघटनेच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या उत्तर गोवा शाखेच्या सदस्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. त्यानुसार 13 ते गुरुवार 15 जूनपर्यंत हे दुकान बंद आंदोलन राबवले आहे.

Mapusa News
Accident at Curchorem: कुडचडेत ड्रायव्हिंग स्कूलच्या कारला बसची धडक; मुलगी जखमी

गेल्या काही महिन्यांपासून म्हापशासह उत्तर गोव्यातील कारागिरांना चोरट्यांकडून चोरीचे दागिने खरेदी केल्याच्या नावाखाली देशातील काही राज्यांतील पोलिसांनी छळ चालवला आहे.

चोरट्यांना गोव्यात आणून कोणत्याही दुकानासमोर उभे केले जाते व त्या दुकानदारांकडून दागिने वसुलीच्या नावे लुबाडणूक करण्याचा प्रकार सर्रासपणे चालू आहे. यासाठी खाकी वर्दीचा धाक दाखवला जातो, असा आरोप या कारागिरांनी केला आहे.

Mapusa News
Sanquelim Municipality : पालिकेच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलीय ग्वाही; म्हणाले, साखळीचा विकास...

हा एकंदरीत प्रकार गोव्यातील सुवर्णलंकार व्यवसाय नष्ट करणारा आहे. याचा निषेध म्हणून गेल्या पंधरावड्यापासून सुवर्णलंकार कारागिरांनी राज्यात आंदोलन छेडले आहे. याचाच भाग म्हणून तीन दिवस हे दुकान बंदचे आंदोलन छेडले आहे, असे या संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com