Babu Kavalekar Dainik Gomantak
गोवा

बाबू कवळेकर यांचा केपे मतदारसंघात अनपेक्षित पराभव

त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनाही सांगेत विजयाने हुलकावणी दिली.

दैनिक गोमन्तक

केपे: केपे मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांना पराभवाचा अनपेक्षित धक्का सहन करावा लागला. दुसरीकडे त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनाही सांगेत विजयाने हुलकावणी दिली. या मतदारसंघांत अनुक्रमे काँग्रेसचे एल्टन डिकॉस्‍टा व भाजपचे सुभाष फळदेसाई विजयी झाले.

केपे मतदारसंघ राखण्यास यावेळी काँग्रेस पक्षाला यश आले आहे तर 2017 च्‍या निवडणुकीत सुभाष फळदेसाई यांचा सांगेतून पराभव झाला होता, त्याचा वचपा त्यांनी यावेळी काढला.

कवळेकर हे या मतदारसंघातून सलग चार वेळा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. सावित्री कवळेकर यांनी भाजपचे सुभाष फळदेसाई यांच्याविरोधात सांगेतून उमेदवारी दाखल केल्याने फळदेसाई यांचे केपेतील समर्थक बरेच नाराज झाले होते.

सांगेतील राजकारण बाबू कवळेकर यांना भोवले. उपमुख्‍यमंत्रीपद मिळताच त्‍यांनी लोकांकडे दुर्लक्ष केले. सांगेत सुभाष फळदेसाई यांच्याविरोधात आपल्या पत्नीला उभे करून त्‍यांनी भाजपलाच आव्हान दिले होते. त्‍यामुळेच त्‍यांचा दारुण पराभव झाला.

- योगेश कुंकळयेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT