Understanding expectations of Center will start working on goa elections: Fadnavis Dainik Gomantak
गोवा

केंद्राच्या अपेक्षा समजून घेवून गोवा निवडणुकीच्या कामाला लागेल: फडणवीस

गोव्यात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाने आगामी (BJP) गोवा (Goa) विधानसभा निवडणूकीचे (Election) प्रभारी (in-charge) म्हणून महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती केली आहे. फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) काळामध्ये गोव्यात प्रचारासाठी येत होते. तेव्हा आता त्यांच्यावर भाजप पक्षाची जबाबदारी आली आहे.

या नियुक्तीनंतर देवेंद्र फडणविस यांनी आभार व्यक्त केले. "गोव्यातील जनता भारतीय जनता पक्षाला पुन्हा निवडून देणार अशी आशा आहे. गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न करू.मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्याच्या मंत्रिमंडळांनी गोव्यात चांगले काम केले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भाजपचं वेगळ स्थान निर्माण केलंय. तेव्हा मनोहर पर्रीकरांची कमतरता यावेळी जाणवेल. यापुछे पक्षासंबधी काही निर्णय केंद्राशी बोलून घेण्यात येईल. केंद्राच्या अपेक्षा समजून घेवून गोवा निवडणूकीच्या कामाला लागेल," असे फडणविस म्हणाले.

गोव्यातील निवडणुकीची जबाबदारी महाराष्ट्रातील नेत्याकडे दिली जाईल अशी अटकळ होती कारण भाजपचा सगळा भर उत्तर गोव्यातील मतदारसंघावर आहे. फडणवीस यांनी अलीकडेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचीही भेट घेतली होती. फडणवीस यांच्याकडे विधानसभेच्या 2007 मधीलय निवडणुकीवेळी साळगाव मतदारसंघाची जबाबदारी होती आणि तेथून त्यांनी भाजपचा उमेदवार विजयी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT