underprivileged women Dainik Gomantak
गोवा

Goa News: वंचित महिला, ट्रान्‍सजेंडर समुदायात आमुलाग्र बदल

भारतात शहरी भागांमधील ७० टक्‍के महिला इंटरनेटचा वापर करतात

दैनिक गोमन्तक

Underprivileged Women: नॅशनल फॅमिली हेल्‍थ सर्व्‍हे (एनएफएचएस) (२०२०-२१) नुसार, भारतात शहरी भागांमधील ७० टक्‍के महिला इंटरनेटचा वापर करतात, तुलनेत ग्रामीण भागात ४९.६ टक्‍के महिला इंटरनेटचा वापर करतात.

यामधून महिलांमध्‍ये डिजिटल साक्षरतेमधील मोठी लैंगिक तफावत दिसून येते, जी शहरांच्‍या तुलनेत ग्रामीण भागांमध्‍ये सर्वाधिक आहे. ही बाब लक्षात येताच ‘प्रोजेक्‍ट प्रगती'द्वारे वंचित महिला व ट्रान्‍सजेंडर समुदायाच्या कौशल्यात वृद्धी करण्यात येत आहे.

पी अँड जीच्या या उपक्रमाने ६०० हून अधिक महिला व ट्रान्‍सजेंडर्सच्‍या जीवनात सकारात्‍मक बदल घडवला आहे. समुदाय सामाजिक व आर्थिकदृष्‍ट्या सक्षम होण्‍यासह मोठ्या प्रमाणात रोजगार संधी मिळतात.

तसेच प्रोजेक्‍ट प्रगतीने १ लाख व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, ज्‍यामध्‍ये शालेय विद्यार्थिनी, आयटीआय,पदवीधर विद्यार्थी, वंचित महिला व ट्रान्‍सजेंडर लाभार्थींचा समावेश आहे.

‘प्रोजेक्‍ट प्रगती’या उपक्रमातून ट्रान्सजेंडर तसेच वंचित महिलांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. या उपक्रमातून कोर्सेसमधील सहभागींना कौशल्‍य-आधारित प्रमाणपत्र देखील दिले जाते.यातून प्रोजेक्ट प्रगतीची पोहोच व प्रभाव वाढत आहे.

-एलव्‍ही वैद्यनाथन,

मुख्‍य कार्यकारी अधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT