Goa Fraud Case: मृत व्यक्तीचे बनावट मुखत्यारपत्र बनवून जमीन विकली; तिघांवर गुन्हा

मालकी हक्क असलेल्या मृत व्यक्तीचे बनावट मुखत्यारपत्र तयार करून फिर्यादी जमीन वारसदाराची हणजूणमधील जमीन परस्पर विकल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला.
Goa Fraud Case
Goa Fraud Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fraud Case : मालकी हक्क असलेल्या मृत व्यक्तीचे बनावट मुखत्यारपत्र तयार करून फिर्यादी जमीन वारसदाराची हणजूणमधील जमीन परस्पर विकल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला.

Goa Fraud Case
Dona Paula: दीड वर्षांनंतरही 14 दुकाने बंदच

याप्रकरणी अँथनी रॉकी डिसोझा (६३, हडफडे), एस्टेला रॉड्रिग्ज (हणजूण) व तिसऱ्या अज्ञाताविरोधात हा गुन्हा दाखल केला. संशयितांनी हणजूणमधील १०.५५० चौरस मीटर जमीन विकली असून मेर्विन मिरांडा हे तक्रारदार आहेत. पोलिसांनी संशयितविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९, ४६४, ४६५, ४६७, ४२० व ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविला.

Goa Fraud Case
Kadamba Transport: ‘कदंब’च्या पहिल्या 23 बसेस भंगारात !

मेर्विन मिरांडा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, जोस मिरांडा यांचे दि. २५ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले. मात्र, संशयितांनी मिरांडा यांच्या नावे दि. २२ जानेवारी २००७ रोजी, बनावट मुखत्यारपत्र बनवून वरील हणजूणमधील जमिनीची ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ अंमलात आणून ही जमीन परस्पर विकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com