Uncle Thrown Nephew in Well
Uncle Thrown Nephew in Well  Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक; काकाने पुतण्याला खोल विहिरीत फेकलं

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : आपली नको असलेली भानगड आपला पुतण्या बाहेर फोडेल या भीतीने काकानेच आपल्या 13 वर्षीय पुतण्याला 35 फूट खोल विहीरीत फेकून देण्याची घटना कुडतरी येथे घडली असून या प्रकरणी मायणा - कुडतरी पोलिसांनी बसवराज कागी (45) याला अटक केली आहे.

ही घटना काल सायंकाळी घडली. संशयित कागी हा मोतीडोंगर परिसरात राहात असून काल सायंकाळी त्याने आपल्या पुतण्याला रानात एका झाडाला चांगले आंबे लागले आहेत ते तुला दाखवतो असे सांगून कुडतरी येथील जंगलात आणले. तिथे एक 35 फूट खोल विहीर असून त्याने त्याला त्या विहिरीजवळ आणले. आणि जवळपास कुणी नसल्याचे पाहून त्याला विहिरीत ढकलून दिले. आणि घटनास्थळावरून पळ काढला.

मात्र त्या मुलाच्या सुदैवाने त्या विहिरीला चढून वर येण्यासाठी दगड लावले असून त्या मुलाने रात्रीच्या काळोखातही मोठा धीर दाखवीत त्या दगडांच्या साहाय्याने वर चढत आपला जीव वाचविला.

नंतर त्याने कसेबसे घर गाठले. आपल्यावर गुदरलेला प्रसंग त्याने घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली. सदर मुलगा जखमी झाल्याने त्याला इस्पितळात दाखल केले. आज सकाळी फरार असलेल्या त्याच्या काकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार संशयित कागी याचे एक लफडे होते आणि त्याची माहिती या मुलाला होती. आपली ही भानगड बाहेर येणार या भीतीने त्याने आपल्या पुतण्याला जिवंत मारण्यासाठी त्या विहिरीत ढकलून दिले.

मायणा कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीच्या विरोधात बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली तसेच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT