Korgao Tree Cutting Incident Dainik Gomantak
गोवा

Korgao: संरक्षक भिंत, रस्त्यासाठी शेकडो झाडांची कत्तल! कोरगावातील धक्कादायक प्रकार; तक्रार करूनही सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष

Korgao Tree Cutting: मुख्य रस्त्याकडून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर हा प्रकार सुरू असून सरकारी यंत्रणा याबाबत मूग गिळून घेऊन गप्प आहे.

Sameer Panditrao

Korgao Tree Cutting Incident

मोरजी: कोरगाव पंचायत क्षेत्रात सर्वे क्रमांक २३९/० मधील जमिनीवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. या भिंतीचे बांधकाम करत असताना वनखात्याची परवानगी न घेता शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

राहुल भगत या युवकाने कोरगाव पंचायत क्षेत्रात सर्वे क्रमांक २३९/० त्यामध्ये बेकायदेशीर संरक्षक भिंत बांधण्याचे काम जोमात सुरू असल्याचे सांगितले. कंपाउंड बांधताना हजारोच्या संख्येने झाडे कापल्याचे माहिती पत्रकार परिषदेत दिली.याबाबत त्यांनी ही माहिती देतानाच या भागातील जे नैसर्गिक झरे होते आणि त्यामुळे कोरगाव गावाला आणि सुकाळे भागात जे पाणी वाहून जात होते, हे पाणी शेतीला उपयुक्त होते. हे झरे एकाने नष्ट केले,असे सांगितले.

भगत आपल्याला बदनाम करताहेत; सरपंच

सरपंच अब्दुल करीम नाईक म्हणाले की, राहुल भगत हे माझ्या प्रभागातच राहतात. त्यांचा डाव हा पंचायत निवडणूक लढवण्याचा आहे. त्यामुळे विविध प्रकारे ते खटले दाखल करत आहेत. आपण अपात्र ठरल्यानंतर त्यांना पंचायत निवडणुकीत ते निवडून येऊ, असा त्यांचा मानस व इरादा असून त्या दृष्टिकोनातून ते नाहक त्रास देण्याचे काम करत आहेत,असे सरपंच अब्दुल करीम नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT