korgao farm cutdown incident
korgao farm cutdown incidentDainik Gomantak

Korgao: ज्येष्ठ महिलेच्या बागायतीत घुसून 30 पोफळी, 2 कवाथे कापले! कोरगावातील दुर्दैवी प्रकार

Korgao Farm: वडेवाडा-कोरगाव येथे रविवारी (ता.१२) रात्री सावित्री गावडे या वृद्ध महिलेच्या मालकीच्या बागायतीमधील पोफळी व कवाथे अज्ञात व्यक्तींनी कापून टाकले.
Published on

पेडणे: गावडेवाडा-कोरगाव येथे रविवारी (ता.१२) रात्री सावित्री गावडे या वृद्ध महिलेच्या मालकीच्या बागायतीमधील पोफळी व कवाथे अज्ञात व्यक्तींनी कापून टाकले. त्यात ३० पोफळी व दोन कवाथ्यांचा समावेश आहे. यामुळे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सावित्री गावडे या आपल्या मुलीसह राहतात. सुमारे दहा वर्षे मेहनत करून त्यांनी पोफळी व कवाथे लावले होते. आपले कुणाशीही वैर नसताना कुणी हे कृत्य का केले हेच आपणाला कळत नाही, असे दु:खी होऊन सावित्री गावडे यांनी सांगितले.

korgao farm cutdown incident
Korgao Gramsabha: गोंधळ, वादावादी, पंच-सरपंच भिडले, अखेर नागरिकांचा हस्तक्षेप

पेडणे पोलिसांत नोंदविली तक्रार

याप्रकरणी सावित्री गावडे यांचा नातू कल्पेश कृष्णा नाईक यांनी पेडणे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या भागात अधूनमधून भुरट्या चोऱ्या वगैरे होतात. या परिसरात रात्रीच्यावेळी पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com