Goa News | Ulhas Tuyekar Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus: प्रवाशांची गैरसोय ओळखत 'कदंब'ने घेतला 'हा' निर्णय; अध्यक्ष तुयेकर म्हणाले लवकरच....

''दर ठरल्यानंतर पुढील निर्णय घेणार ''

दैनिक गोमन्तक डिजिटल

वेळेवर सार्वजनिक वाहतूकीसाठी कदंब बसची संख्या कमी असल्याने समस्यांना सामोर जावे लागत असल्याची तक्रार नागरीकात आहे. यावर कदंब महामंडळाने मार्ग काढला असून, प्रवाशांची समस्यांतून सुटका होण्यासाठी खासगी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आज कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिली आहे.

(Ulhas Tuenkar informed that the Kadamba Corporation will take private buses on lease)

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कदंब बसची संख्या वाढवाव्या अशी मागणी नागरीकांतून होत आहे. वेळेत बस नसतील तर घरातून बाहेर पडलेल्या कामासाठी वेळ न जाता तो प्रवासात अधिक जातो अशी खंत काही प्रवाशांनी व्यक्त केली होती. यावर कदंब महामंडळाने पर्याय शोधला असून कदंब महामंडळ खासगी बस देखील चालवायला घेणार असल्याने बसची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

खासगी बस कदंब महामंडळ चालवायला घेणार असल्याची माहिती देताना कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर म्हणाले की, आतापर्यंत 140 खासगी बस मालकांकडून प्रतिसाद आला आहे. मात्र दराबाबत अधिक चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे दर ठरल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT