Ukrainian tourists stranded in Goa  Twitter
गोवा

गोव्यात अडकलेल्या युक्रेनियन पर्यटकांनी मागितली भारत सरकारला मदत

गोव्यात युक्रेनियन पर्यटकांचे निदर्शने

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात पर्यटक (Goa Tourism) म्हणून आलेल्या युक्रेनमधील सुमारे 10 ते 12 नागरिकांच्या गटाने रशियाने आपल्या देशावर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात शुक्रवारी गोव्याची राजधानी पणजीत (Panaji) शांततापूर्ण निषेध मोर्चा काढला. येथे त्यांनी सेंट मेरी इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चच्या बाहेर निदर्शने केली. त्यांच्या हातात देशाच्या समर्थनार्थ फलक होते. त्यांनी भारत सरकारला रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपेपर्यंत निर्वासितांचा दर्जा देण्याची विनंती केली. (Ukrainian tourists stranded in Goa)

या आंदोलकांनी हातात युक्रेनचा ध्वज धरला होता आणि चेहऱ्यावर युक्रेनचा राष्ट्रध्वज लावला होता. यावेळी त्यांनी से नो टू वॉरचे बॅनर हातात धरून 'आम्ही युक्रेनसोबत आहोत' अशा घोषणा दिल्या. रशियाने हल्ला (Ukraine Russia War) केलेल्या आपल्या देशाला भारताने मदत करावी, अशी विनंती या पर्यटकांनी भारताला केली आहे. यावेळी आपला देश आपल्या अस्तित्वासाठी लढत असल्याचे ते म्हणाले.

'रशियन हल्ला रोखण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा'

गोव्यातील येथील सेंट मेरी इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्चजवळ जमलेल्या आंदोलकांनी रशियाचा त्यांच्या देशावरील हल्ला रोखण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. 'आम्ही भारताकडून मदतीची विनंती करतो. भारत एक शक्तिशाली देश आहे. अनेक युक्रेनियन गोव्यात स्थायिक आहेत, परंतु काही युक्रेनियन नागरिक पर्यटक म्हणून आले होते आणि आता ते भारतात अडकले आहोत,' असे युक्रेनियन महिला झेनिया म्हणाली.

युक्रेनवासियांनी भारताकडे मागितली मदत

'आम्ही भारतीयांमध्ये परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आंदोलन करत आहोत. आम्हाला शांतता हवी आहे.भारत एक शक्तिशाली देश आहे. आम्ही भारताने आम्हाला आणि युक्रेनला मदत करण्याची विनंती करतो. आम्हाला मंजुरीपेक्षा भयमुक्त जिवन जगायचे आहे आता आमच्या देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आणि आत्ता जे आमच्या देशात घडत आहे ते थांबविण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा,' अशी विनंती एका युक्रेनियन नागरिकाने भारत सरकारकडे केली आहे.

निदर्शनात भाग घेतलेल्या एका युक्रेनियन निदर्शकाने सांगितले, 'आम्ही आमच्या देशात परत जाऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही भारत सरकारला विनंती करतो की आम्हाला निर्वासितांचा दर्जा द्यावा तसेच रशियाला माघार घेण्यास सांगावे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT