CM प्रमोद सावंत यांचे विदेश मंत्रालयाकडे मदतीचे आवाहन...

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोव्याच्या नागरिकांसाठी केले आवाहन; नागरिकांना राज्यात सुरक्षित परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड
CM Pramod Sawant News Updates
CM Pramod Sawant News UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: युक्रेनमध्ये अडकलेल्या गोव्याच्या नागरिकांबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चिंता व्यक्त केली. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना गोव्याच्या नागरिकांना राज्यात सुरक्षित परत आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले “आम्ही युक्रेनमध्ये अडकलेल्या गोव्याच्या नागरिकांबद्दल चिंतित आहोत. रशिया-युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर अडकलेले नागरिक भारतात परतण्याचा विचार करत आहेत. मी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांना गोवावासीयांच्या सुरक्षित परतीसाठी मदतीची विनंती करतो. तसेच मी परिस्थितीचा मागोवा घेत आहे.” असे ट्विट सावंत यांनी केले. (CM Pramod Sawant appeal to Ministry of External Affairs for help to citizens of Goa stranded in Ukraine)

CM Pramod Sawant News Updates
आमदार अपात्रता याचिका हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजप कडुन पहिली प्रतिक्रीया

रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्ध घोषित केले असुन, युक्रेनियन येथील छीव आणि खार्किव या शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, रशियन आक्रमणाची सुरुवात झाल्याचे वृत्त संस्थांनी दिले आहे. युक्रेनच्या पूर्व भागात लष्करी कारवाई करण्याचे आज व्लादिमीर पुतीन यांनी जाहीर केले होते. रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिनयांनी युक्रेनवर युद्ध घोषित केले. (Russia Ukraine War)

गोव्यातील (Goa) जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना सुरक्षितपणे गोव्यात परत आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी एनआरआय आयुक्त सवाईकर यांनी विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांच्याकडे काल केली होती. रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे गोव्यातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नागरिकांची जबाबदारी आपली असुन, त्यांना लवकरात लवकर राज्यात परत आणणे गरजेचे आहे.

भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू

युक्रेन (Ukraine) आणि रशियाच्या सीमेवरील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गंभीर परिस्थिती पाहता, एअर इंडियाच्या (Air India) पहिल्या विमानाने मंगळवारी रात्री 242 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यात आले. मायदेशी परतलेल्या या भारतीयांनी युक्रेनमधील परिस्थितीही सांगितली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com