Omkar Elephant Update Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: तांबोशे झाले आता उगवे! 'ओंकार'मुळे शेतकरी त्रस्त; भातशेती, केळी, पोफळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Elephant in Goa: वन खात्याचे कर्मचारी या हत्तीवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्याकडे त्याला रोखण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही.

Sameer Panditrao

मोरजी: उगवे परिसरात गेल्या तीन दिवसांपासून ओंकार हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. वन खात्याचे कर्मचारी या हत्तीवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्याकडे त्याला रोखण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहने राष्ट्रीय महामार्ग ६६ वर तैनात असून शेतकऱ्यांना विविध सूचना दिल्या जात आहेत. मात्र, सरकारकडे अद्याप प्रशिक्षित हत्ती तज्ज्ञ मंडळी उपलब्ध नाहीत. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिवाळी-दसऱ्याच्या नंतर तज्ज्ञ येणार असल्याची आश्वासन दिले आहे.

ओंकारने सुरुवातीला तांबोशे गावात सात दिवस राहून मोठी नुकसान केली. आता तो त्याचा मोर्चा उगवे भागाकडे वळवला आहे. उगवे परिसरात केळीची झाडे, कवाथे, पोफळी आणि भातशेती मोठ्या प्रमाणात असून ताण गवतामुळे ओंकार हत्तीला लपून राहणे सोपे झाले आहे. वन खात्याचे कर्मचारी ओंकारचा ठावठिकाणा शोधू शकत नाहीत, तर शेतकरी दूरवरूनच हत्ती कुठे आहे हे लक्षात आणून देतात.

ओंकारने उगवे परिसरातील शेती फस्त करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना त्याचा पाठलाग करणे देखील कठीण ठरत आहे. तांबोशे परिसरात झालेल्या नुकसानीचा आकडा लाखो रुपयांचा असून, शेतकऱ्यांनी दोन ते तीन लाखांच्या नुकसानीची माहिती दिली आहे. वनखात्याचे कर्मचारी शेतकऱ्यांना शेतात जाण्यापासूनही रोखत आहेत, ज्यामुळे पाळीव प्राण्यांना चारा मिळण्यास अडचण येत आहे.

कृषिमंत्री रवी नाईक यांनी ओंकार हत्तीला गणपतीच्या रूपात पाहण्याचा उल्लेख करत नुकसान भरपाई देण्याचा आश्वासन दिले आहे. मात्र, भरपाई कधी आणि किती प्रमाणात मिळेल, याबाबत अजून माहिती उपलब्ध नाही. उगवे परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत, त्यामुळे त्वरित उपाययोजना अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Renuka Chowdhury: 'चावणारे तर संसदेत बसलेत...' काँग्रेस खासदार रेणुका चौधरींची पाळीव कुत्र्यासोबत एन्ट्री Watch Video

Samantha Ruth Prabhu: चर्चांना पूर्णविराम! समंथाने बांधली लग्नगाठ, नवऱ्यासोबतचा पहिला Photo Viral

रात्रीस खेळ चाले! पिर्णा रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य; Viral Videoतून 'संपेल ना कधीही हा खेळ सरकारचा' गाणं हिट

VIDEO: यशस्वी जयस्वालची 'तेरे नाम' हेअर स्टाईल, विराट कोहलीने उडवली खिल्ली; पाहा खेळाडूंची ऑन-कॅमेरा मस्ती

Goa Accident: अपघाताचे सत्र थांबेना! मुरगाव येथे भरधाव कारची दुचाकीला धडक, 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT