पणजी: छत्रपती शिवाजी महारांजाबाबत वक्तव्य केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या लेखक उदय भेंब्रे यांचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. नव्या व्हिडिओत भेंब्रे यांनी मागील व्हिडिओमुळे झालेल्या वादाचा संदर्भ देत त्यांनी गोव्यात असणाऱ्या शिवशाहीबद्दल एकही इतिहासकाराने का लिहले नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, शिवरायांनी गोव्यातील हा प्रदेश जिंकला, हा तुलका जिंकला असे सांगतात पण, जिंकले म्हणजे राज्य केले असा त्याचा अर्थ होत नाही, असे भेंब्रे यांनी म्हटले आहे.
लेखक उदय भेंब्रे यांनी इतिहासाचे प्राध्यापक प्रज्वल साखरदांडे यांच्या एका व्हिडिओ संदर्भ दिला आहे. "साखरदांडे यांनी त्यांच्या व्हिडिओत शिवाजी महाराजांनी गोव्यातील हा प्रदेश जिंकला, तो तालुका जिंकला अशी भाषा वापरतात. पण, जिंकले याचा अर्थ राज्य केले असा होत नाही. तसेच, उत्तरेतील तीन तालुके देसाई यांच्याकडे होते तर दक्षिणेतील तीन तालुके सौंदेकार राजाकडे होते. सौंदेकार राजाने कधीतरी हे तालुके जिंकले असतील? पोर्तुगिजांनी सौंदेकार राजाकडून तालुके घेतले असतील तर केव्हातरी शिवरायांच्या ताब्यातून गेले असतील? याबाबत कोणी भाष्य करत नाही", असे उदय भेंब्रे यांनी म्हटले आहे.
"प्रज्वल साखरदांडे गोव्यातील शिवरायांनी जिंकलेल्या प्रदेशाचा संदर्भ देताना जिंकलेले साल सांगतात, पण लढाई कधी झाली? याबाबत साखरदांडे का सांगत नाहीत", असे भेंब्रे यांनी व्हिडिओत म्हटले आहे. याबाबत बोलताना भेंब्रे यांनी गोव्यातील आदीलशाहीच्या बारा वर्षांचा दाखल देखील दिला आहे.
"इतिहासकार (१४९८ ते १५१०) या काळात आदीलशाहीचे राज्य होते, याबाबत इतिहासकार सांगतात. असे असेल तर मग गोव्यातील शिवाजी महाराजांच्या राज्य असल्याबद्दल कोणताच इतिहासकार सांगत का नाही? एवढेच नव्हे तर गोवा सरकार देखील याबाबत सांगत नाही", असे भेंब्रे यांनी म्हटले आहे.
प्रज्वल साखरदांडे यांच्याकडून अशाप्रकारचा इतिहास सांगितला जावा, अशी अपेक्षा नाही, असे भेंब्रे यांनी म्हटले आहे. भेंब्रे यांनी या व्हिडिओतून श्रावणी शेट्येवर देखील भाष्य केले आहे.
"संपूर्ण गोव्यात ४५० वर्षे पोर्तुगीज राजवट नव्हती, नव्या काबिजादीत शिवशाही होती आणि शिवरायांमुळे धर्मांतरणाला चाप बसला या तिन्ही मुद्यांवर श्रावणीने कोणतेही भाष्य केले नाही. अभ्यास नसल्यामुळे तिने काही भाष्य केले नाही", असे उदय भेंब्रे यांनी म्हटले आहे. श्रावणी शेट्येने केवळ बार्देशातील घटना उचलून धरत भाष्य केले आहे.
उदय भेंब्रेंचा नवा व्हिडिओ येथे पाहा
बार्देशातील घटना योगायोगाने घडली असे मत भेंब्रे यांनी मांडले आहे. "शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या राज्यात केव्हांच थेट हल्ला केला नाही. बार्देशात शिवाजी महाराज आले होते त्याचे कारण केशव नाईक देसाई या व्यक्तीला पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी. शिवरायांच्या सैन्यांनी कोलवाळ पर्यंतचा भाग शोधून काढला पण केशव नाईक देसाई सापडले नाहीत", असे भेंब्रे म्हणाले.
"१६६३ साली सैन्याने घरे लुटली, महिला - मुलांना जबरदस्तीने नेले आणि तीन पाद्रींना मारले, कोणत्याचा इतिहासकारांनी शिवरायांच्या सैन्यांनी केले असं म्हटले नाही. मी देखील ते म्हणत नाही. दरम्यान, लोके घाबरलेली असल्याने तीन दिवस पाद्रींचे प्रेत तिथेच पडून होते अशी माहिती आहे", असे भेंब्रे यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.