Table Tennis Championship Dainik Gomantak
गोवा

Goa Table Tennis : लॉयला, किंग्स स्कूलला टेबल टेनिसचे विजेतेपद

स्पर्धेतील अंतिम लढती बुधवारी कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये झाल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील टेबल टेनिस स्पर्धेत मुलींत मडगावच्या लॉयला उच्च माध्यमिक विद्यालयाने, तर मुलांत सां जुझे द आरियलच्या किंग्स स्कूलने विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील अंतिम लढती बुधवारी कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये झाल्या.

मुलींच्या अंतिम लढतीत लॉयला उच्च माध्यमिक विद्यालयाने कुजिरा येथील मुष्टिफंड उच्च माध्यमिक विद्यालयाचा चुरशीच्या लढतीत ३-२ असा पराभव केला. विजयी संघात शनाया साल्ढाणा, जीना काब्राल, रिया कुडचडकर, ऊर्वी सुर्लकर, ईशा बार्रेटो या खेळाडूंचा समावेश होता. संघाला शारीरिक शिक्षण शिक्षक सुरेंद्र देसाई यांचे

मार्गदर्शन लाभले

मुलांच्या गटातील अंतिम लढतीत किंग्स स्कूलने पणजीच्या डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालयास ३-० असे सहज हरविले. विजेत्या संघाचे अगस्त्य मोटवानी, डेव्ह डायस, झियान विराणी, आरव अय्यर, वंश पटेल या खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. संघाला शारीरिक शिक्षण शिक्षक सगुण गावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

बक्षीस वितरण बोर्डा सरकारी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक अॅरन परेरा, डिचोलीच्या नारायण झांट्ये महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक सत्यवान हरमलकर, हरमलच्या गणपत पार्सेकर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक अनिकेत केरकर, क्रीडा खात्याचे राज्य क्रीडा आयोजक अनंत सावळ, तांत्रिक अधिकारी विष्णू कोलवाळकर व जयवंत यांच्या उपस्थितीत झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT