Goa News 
गोवा

शिक्षकदिनी गोव्यात दोन महिला शिक्षकांना अटक, विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण भोवली

Goa Crime: शिक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री सावंत यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य कारवाई होईल अशी ग्वाही दिली.

Pramod Yadav

म्हापसा: वागाळी - कामुर्ली येथील प्राथमिक विद्यालयात चौथीत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या दोन शिक्षिकांना अटक करण्यात आली आहे. कोलवाळ पोलिसांनी सुजल गावडे (रा. वेरे) आणि कनिषा गडेकर (रा. पिर्णा) यांना अटक केलीय.

वहीची दोन पाने फाडली म्हणून चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला दोन शिक्षिकांनी मारहाण केली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी प्रकरणाची तात्काळ दखल घेत शिक्षिकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), १२६ (२), ३५१ (२) व ३ (५) आणि गोवा बाल कायदा कलम ८ अन्वये गुन्हा नोंद केला.

मुख्यमंत्री आणि शिक्षण खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर संबधित शाळा व्यवस्थापनाने शिक्षिकांना निलंबित केले. दरम्यान, आज (०५ सप्टेंबर) या दोन्ही शिक्षिकांना पोलिसांनी अटक केली.

चौथीच्या विद्यार्थ्याला अशाप्रकारे मारहाण करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त झाली. शिक्षण मंत्री तथा मुख्यमंत्री सावंत यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य कारवाई होईल अशी ग्वाही दिली.

कोलवाळ पोलिसांनी बुधवारी दोन्ही शिक्षकांना नोटीस बजावत चौकशी देखील केली. अखेर आज (०५ सप्टेंबर) दोन्ही शिक्षिकांना अटक केली.

कोलवाळ PI आणि IO यांच्या निलंबनाची हळर्णकरांची मागणी

दोन्ही शिक्षिकांकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप स्थानिक आमदार मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी केला. कायद्याचे योग्य ज्ञान नसल्याने योग्य कलमेच लावली नाहीत असे म्हणत हळर्णकरांनी पोलिस निरीक्षकासह (PI) तपास अधिकाऱ्याचे (IO) निलंबन करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT