Mulgao Accident Dainik Gomantak
गोवा

Mulgao Accident: मुळगावात दोन दुचाकींमध्ये अपघात! रस्त्यावर पडून दोन्ही चालक जखमी

Mulgao Road Accident: मुळगाव येथील मुख्य रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीचालक जखमी झाले. अपघात घडला त्यावेळी रस्त्यावरून एकही वाहन ये-जा करीत नव्हते, त्यामुळे रस्त्यावर मधोमध पडलेले दोन्ही युवक सुदैवाने बचावले.

गोमन्तक डिजिटल टीम

Mulgao Accident

डिचोली: मुळगाव येथील मुख्य रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीचालक जखमी झाले. अपघात घडला त्यावेळी रस्त्यावरून एकही वाहन ये-जा करीत नव्हते, त्यामुळे रस्त्यावर मधोमध पडलेले दोन्ही युवक सुदैवाने बचावले. हा अपघात रविवारी सकाळी तांबडारस्ता जंक्शनजवळ घडला.

अपघातात जखमी झालेला एक युवक मुळगाव परिसरातील तर दुसरा युवक पेडणेतील असल्याची माहिती अपघात स्थळावरून मिळाली. उपलब्ध माहितीनुसार जीए-०४-पी-२६४२ या क्रमांकाची स्कूटर अस्नोड्याहून मुळगावच्या दिशेने येत होती. तर जीए-११-सी-५६८८ या क्रमांकाची स्कूटर अस्नोड्याच्या दिशेने जात होती.

मुळगावच्या तांबडा रस्ता जंक्शनकडे पोचताच दोन्ही स्कूटर समोरासमोर धडकल्या. त्यात दोन्ही स्कूटरचालक रस्त्यावर पडून जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमी युवकांना उपचारासाठी डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात पाठवले. प्राथमिक उपचार करून दोन्ही युवकांना नंतर घरी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT