Arrest Dainik Gomantak
गोवा

Maharashtra Murder Case: महाराष्ट्रात खून करुन फरार झालेल्या दोघांना गोव्यातून अटक

Maharashtra Crime News: खून गुन्ह्यात पाहिजे असलेले संशयित गोव्यात लपून बसल्याची माहिती उमरगा पोलिसांना मिळाली.

Pramod Yadav

Maharashtra Murder Case

कोलवा: महाराष्ट्रात खून करुन फरार झालेल्या दोघांना गोव्यातून अटक करण्यात आली आहे. उमरगा पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीने बेताळभाटी येथून शुक्रवारी (१७ जानेवारी) दोघांना अटक केली.

विकास दत्तात्रय जमादार (२६ उमरगा, महाराष्ट्र) आणि आकाश सहदेव मुतळे (उमरगा, महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक पुजरवाड यांच्या नेतृत्वाखालील टीमने कोलवा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. अटक दोन्ही संशयित खूनाच्या गुन्ह्यात पाहिजे होते.

खून करुन फरार झालेल्या या दोघांचा उमरगा पोलिस शोध घेत होते. दरम्यान, दोघेही गोव्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उमरगा पोलिसांनी गोवा पोलिसांनी याची माहिती दिल्यानंतर दोघांनी मिळून सखोल तपासास सुरुवात केली. अखेर दोघेजण बेताळभाटी येथे आढळून आले. कोलवा पोलिसांनी सोपस्कर पूर्ण करुन दोघांना पुढील कारवाईसाठी उमरगा पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिस उपनिरिक्षक प्रथमेश महाले, हेड कॉन्स्टेबल रोहन नाईक, पोलिस कॉन्स्टेबल टोनी डिसोझा, सिद्धेश शिरोडकर, अक्षय वरक, अमर गांवकर, सत्यम देसाई, सतिश मदार आणि पांडुरग चव्हाण यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

Goa News Live: लुथरा बंधुंना घेऊन दिल्लीतून निघाले गोवा पोलिस

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

SCROLL FOR NEXT