Coldplay Mumbai Concert: चुकीच्या व्यक्तीला दिली कोल्डप्लेच्या मुंबई कॉन्सर्टची  तिकिटे; गोव्यात प्रसिद्ध कुरिअर कंपनीवर गुन्हा
Coldplay Mumbai Concert 2025

Coldplay Mumbai Concert: चुकीच्या व्यक्तीला दिली कोल्डप्लेच्या मुंबई कॉन्सर्टची तिकिटे; गोव्यात प्रसिद्ध कुरिअर कंपनीवर गुन्हा

Coldplay Mumbai Concert 2025: पोलिसांनी कुरिअर कंपनी आणि एका कंपनी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Published on

Coldplay Mumbai Concert 2025

कोलवा: गोवा पोलिसांनी 3.86 लाख रुपयांच्या कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांची चुकीची डिलिव्हरी केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध कुरिअर कंपनी आणि एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. ॲशले फर्नांडिस यांनी दक्षिण गोव्यातील कोलवा पोलिसांत गुरुवारी (१६ जानेवारी) याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ब्रिटीश रॉक बँडच्या मुंबई कॉन्सर्टसाठीची खरेदी केलेली चार तिकिटे दुसऱ्याच व्यक्तीला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Coldplay Mumbai Concert: चुकीच्या व्यक्तीला दिली कोल्डप्लेच्या मुंबई कॉन्सर्टची  तिकिटे; गोव्यात प्रसिद्ध कुरिअर कंपनीवर गुन्हा
माझ्या मुलाला वाचवा! दुर्धर आजारामुळे मातेचा कळवळा, श्रमाच्या कामामुळे हृदय पडते बंद

कुरिअर फर्मने तुषार बन्सल नावाच्या व्यक्तीला कोणतीही पडताळणी न करता 3,86,217 रुपयांची तिकिटे दिली तसेच, त्या व्यक्तीने स्वीकारलीही.

'मी ऑनलाइन पोर्टलवरून तिकिटे बुक केली होती', असे फर्नांडिस यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी कुरिअर कंपनी आणि बन्सल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Coldplay Mumbai Concert: चुकीच्या व्यक्तीला दिली कोल्डप्लेच्या मुंबई कॉन्सर्टची  तिकिटे; गोव्यात प्रसिद्ध कुरिअर कंपनीवर गुन्हा
Saif Ali Khan Attacked: हल्ल्यावेळी सैफच्या शरीरात घुसलेला चाकूचा तुकडा ऑपरेशन करुन काढला

'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर' चा एक भाग म्हणून, कोल्डप्लेचा 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डीवाय पाटील स्टेडियमवर कॉन्सर्ट होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com