Tigar DAinik Gomantak
गोवा

बोंडला राष्ट्रीय उद्यानात पुन्हा सुरू होणार ‘राजा-राणी’ या वाघांचा संसार

कोरोना काळात कंटाळलेल्या पर्यटकांना आता जंगल सफारीचे आकर्षण

दैनिक गोमन्तक

पणजी: ‘राजा-राणी’ या वाघांचा (Tigar) संसार अर्ध्यावरच राहिल्यानंतर बोंडला राष्ट्रीय उद्यानात दोन वाघ आणण्याची योजना दीड वर्षापासून चर्चेत आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील (Goa) उद्याने, अभयारण्ये आणि जंगल सफारी बंद होती. ती आता सुरू होत असून पर्यटकांना (Tourist)राज्‍यातील जंगले खुणावू लागली आहेत. वाघ हे बोंडला राष्ट्रीय उद्यानाचे (Bondla Wildlife Sanctuary) आकर्षण होते; पण सध्या तेथे वाघच नाही.

वन खात्याकडून वारंवार बोंडला उद्यानात वाघ आणला जाणार असल्याचे सांगितले जात होते. सहा महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करून राज्यप्राणी गव्याच्या बदल्यात दोन वाघ आणले जाणार असल्याची घोषणा वन खात्याने केली होती. त्यात नर आणि मादीचा समावेश होता. परंतु सहा महिन्यांनंतरही याबाबत वन खात्याकडून कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. उलट बोंडला उद्यानातील बांधकाम आणि इतर विकासकामांचा हवाला देऊन ही प्रक्रिया बासनात गुंडाळली आहे. सध्या राज्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. पर्यावरणप्रेमी पर्यटकांना नेहमीच बोंडला उद्यानाचे आकर्षण राहिले आहे. अशावेळी उद्यानात वाघ नसणे हे अशोभनीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहेत. याबाबत वन खात्याच्‍या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, यंदाच पर्यटन हंगाम संपण्यापूर्वी उद्यानात वाघ आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.

त्या प्रस्तावाचे काय झाले?

बोंडला उद्यानात वाघ आणण्याचा प्रस्ताव दीड वर्षापूर्वी समोर आला होता. त्यानंतर हे वाघ मध्‍य प्रदेशच्या वन खात्याकडून आयात करण्याची योजना आखण्यात आली होती. वाघांच्या बदल्यात मध्य प्रदेशला गोव्याचा राज्‍यप्राणी असलेला गवा देण्यात येणार होता. त्याबाबत तशी चर्चाही झाली होती. मात्र, करार पूर्ण झालेला नाही. शिवाय या प्रस्‍तावाची प्रक्रियाही पुढे सरकलेली नाही. त्‍यामुळे हा प्रस्ताव जवळपास बासनात गुंडाळला गेल्यात जमा आहे.

बोंडला उद्यानाचे नूतनीकरण सुरू आहे. त्याकारणाने वाघ आणण्याचा प्रस्ताव रखडला आहे. मध्य प्रदेशमधून नर आणि मादी जातीचे वाघ आणण्याची ही योजना होती. मध्यंतरी ती रखडली होती. आता नव्याने याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू असून डिसेंबर अखेरपर्यंत वाघ उद्यानात दाखल होतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- ए. जेबस्टीन, उपसंरक्षणाधिकारी (वन्यजीव आणि उद्याने)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT