Goa Accident Death Dainik Goamantak
गोवा

Goa Accident News: डिचोलीत दोन वेगवेगळे अपघात; पर्यटक महिलेसह दोघे जखमी

Goa Accident Case: डिचोली शहरात आज दोनठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका विदेशी पर्यटक महिलेसह दोघेजण जखमी झाले.

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case: डिचोली शहरात आज दोनठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका विदेशी पर्यटक महिलेसह दोघेजण जखमी झाले. आज (रविवारी) रात्री ८.३० च्या सुमारास जोगीवाडा-डिचोली येथे कार आणि दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक वृद्ध जखमी झाला.

जीए-०१आर ४६५३ ही कार साखळीकडे जात होती. जोगीवाडा येथे साई सर्व्हिससमोर जीए-०१,पी ६४२५ या दुचाकीला कारची धडक बसली. यात दुचाकीवरील एकजण गटारात पडून जखमी झाला. जखमीला उपचारार्थ इस्पितळात नेण्यात आले.

तत्पूर्वी सायंकाळी चारच्या सुमारास पोलिस स्थानकाजवळ घडलेल्या अपघातात विदेशी पर्यटक महिला जखमी झाली. साखळीहून डिचोलीच्या दिशेने जाताना पेट्रोल भरण्यासाठी कार उजव्या बाजूने वळवली असता, मागून येणाऱ्या आणि पर्यटक असलेल्या दुचाकीची कारला धडक बसली. त्यात दुचाकीवरील पर्यटक महिला जखमी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT