Goa Crime News: माझी लढाई उद्याच्‍या अनेक शिवानी जिवंत राहण्‍यासाठी

Goa Crime News: शुभम सिंग : न्यायासाठी शेवटपर्यंत लढणार; दुसऱ्यांवर वेळ येऊ नये यासाठी धडपड
Goa Crime News: माझी लढाई उद्याच्‍या अनेक शिवानी जिवंत राहण्‍यासाठी
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

Goa Crime News: अनुरागने माझी बहीण शिवानी आणि आई जयदेवी यांचा पद्धतशीरपणे व नियोजनबद्धरीत्या खून केल्‍याची मला खात्री होती. गोवा पोलिस माझे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते. पण शेवटी प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरल्याने या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. आता अनुरागला शिक्षा होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही

Goa Crime News: माझी लढाई उद्याच्‍या अनेक शिवानी जिवंत राहण्‍यासाठी
Col. C.K. Nayudu Trophy: गोव्याच्या युवक संघाची धुलाई करत 'आंध्र'ची 404 धावांची कमाई

मी माझी बहीण आणि आई गमावली आहे. अन्य कुणावर ही वेळ येऊ नये यासाठीच माझी ही धडपड सुरू आहे. माझी लढाई उद्याच्या अनेक शिवानी जिवंत राहाव्यात यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया मृत शिवानीचा भाऊ शुभम सिंग याने व्यक्त केली.

18 नोव्हेंबर रोजी वास्को येथे फ्‍लॅटमध्‍ये झालेल्या गॅसगळती स्फोटात शिवानी आणि जयदेवी यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता वास्को पोलिसांनी शिवानीचा पती अनुराग याच्याविरोधात खुनाचा तर सासू साधना सिंग राजवत हिच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा नोंद केला आहे.

आपली बहीण आणि आईचा घातपाताने मृत्यू घडवून आणल्‍याचा आरोप शिवानीचा भाऊ शुभम याने केला होता.

वास्तविक ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी पोलिसांनी दुर्घटनेची भयानकता जाणून घेऊन फॉरेन्‍सिक पथकाकडून घटनास्थळावरील हाताचे ठसे काढून घेणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे केले नाही. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ज्या त्रुटी ठेवल्या, त्या निदान आता तरी ठेवू नयेत. माझ्या मृत आई-बहिणीला न्याय मिळावा यासाठी मी कुठल्याही स्तरावर जाण्यासाठी तयार आहे, असे शुभमने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com