Arrested Dainik Gomantak
गोवा

Russian Arrested In Goa: गोव्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रशियन मायलेकाला अटक

Goa Crime News: वैध कागदपत्राशिवाय गोव्यात वास्तव्य करत असलेल्या रशियन मायलेकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Pramod Yadav

बार्देश: गोव्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या रशियन मायलेकाला अटक करण्यात आली आहे. शिवोली, बार्देश येथे दोघेही बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते. वैध व्हिसाशिवाय वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे.

अँड्री ब्लिझनेतसोव्ह (वय ४८) आणि ब्लिझनेतसोव्हा ल्युडमिला (वय ७५) असे अटक करण्यात आलेल्या रशियन माललेकाचे नाव आहे. दोघेही घर नं. २९६३/३ दांडो, शिवोली, बार्देश - गोवा येथे वैध व्हिसाशिवाय वास्तव्य करत होते. गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत दोघांना अटक केली.

पोलिसांनी याप्रकरणी कलम ७(१) (३) परदेशी कायदा १९४६ कलम १४ अंतर्गत गुन्हा नोंद करत दोघांना अटक केली आहे. पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार, गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर रामानन याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

वैध कागदपत्राशिवाय भारतात राहणे कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी गोव्यात पर्यटनासाठी किंवा कामानिमित्त येणाऱ्या विदेशी पर्यटकांची वारंवार पोलिसांच्या वतीने तपासणी केली जाते. यापूर्वी देखील राज्यात अवैध पद्धतीने वास्तव्य केल्याप्रकरणी विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT