AAP Goa: आम आदमीच्या नेत्याला पोलिसाने मारहाण केल्याचा दावा; दोन्ही आमदार आक्रमक, निलंबनाची मागणी

Goa Politics: आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.
Goa AAP
Goa AAPDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कामानिमित्त पोलिस स्थानकात गेलेले आम आदमी पक्षाचे नेते संदेश तळेकर यांना पोलिसाने मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी आपचे दोन्ही आमदार आक्रमक झाले असून, संबधित पोलिसाच्या निलंबनाची मागणी त्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आप नेते संदेश तळेकर यांना काणकोण पोलिस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने मारहाण करुन हाकलून लावले, असा दावा केला जात आहे. तळेकर यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची माहितीही मिळतेय. आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.

Goa AAP
Khoshi Lokanche Fest : गोव्यात प्रथमच ‘खोशी लोकांचे फेस्‍त’ उत्साहात! आनंद, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन, घुमट गजालीला प्रतिसाद

संदेश तळेकर यांच्या मित्राच्या एका कर्माचाऱ्याला काणकोण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तळेकर पोलिस स्थानकात आले होते. दरम्यान, यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस निरीक्षकाने तळेकर यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.

'मारहाण झाल्याचा दावा करणारी एक बातमी आमच्याकडे आलीय, आम्ही यातील तथ्य तपासून पाहतोय शिवाय सीसीटीव्ही देखील तपासतोय. पोलिस निरीक्षकाने मारहाण केल्याची कोणतीही तक्रार समोर आलेली नाही', असे स्पष्टीकरण दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी दिले आहे. तर प्रोबेशनरी पोलिस निरीक्षक राज शेखर रेड्डी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा, संदेश तळेकर यांनी केला आहे.

घडलेल्या प्रकारावर आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी संताप व्यक्त करता पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केलीय. संदेश तळेकर आपचे नेते असून, त्यांनी २०२२ साली फातोर्डा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

E20 Fuel Impact on Vehicles
Goa Congress Kushavati district
AAP Goa Health Insurance Demand
Smart meter bill issue latest news
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com