Vasco Extortion Case Dainik gomantak
गोवा

Vasco Extortion Case: आणखी दोघांना अटक, दोन पोलिसही निलंबित; वास्कोतील खंडणी प्रकरणाला नवे वळण

Vasco Extortion Case: या प्रकरणात यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या नितेश नाईक आणि मुरगाव भरारी पथकातील अधिकारी अनिरुद्ध पवार या दोघांना अटक केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Extortion Case

दाबोळी येथे दिल्लीतील दोन व्यावसायिकांना अडवून त्यांच्याकडून 16 लाखांची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात वेर्णा पोलिसांनी आज (ता.04) केशव खाणवेकर आणि चंदन यादव या दोघांना अटक केली.

यातील चंदन यादव यानेच या प्रकरणातील मुख्य संशयित नितेश नाईक याला हे दोन्ही व्यावसायिक 16 लाख रुपये घेऊन गाडीने दाबोळीच्या बाजूने जात असल्याची माहिती दिली होती, असे पोलिस तपासात पुढे आले.

या प्रकरणात यापूर्वी वेर्णा पोलिसांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या नितेश नाईक आणि मुरगाव भरारी पथकातील अधिकारी अनिरुद्ध पवार या दोघांना अटक केली होती.

या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्या दोन व्यावसायिकांना आपण आयकर खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून 16 लाखांची रक्कम जप्त केली होती. मात्र, ही रक्कम सरकारी तिजोरीत न भरता स्वतःकडेच ठेवली होती.

या प्रकरणात या दोन्ही कर्मचाऱ्यांच्याविरोधात भादंसंच्या 419 (बनावट ओळख दाखविणे) आणि 384 (बळजबरीने खंडणी वसूल करणे) असे गुन्हे नोंद केले आहेत.

अधीक्षकांनी जारी केला आदेश

16 लाखांची खंडणी घेतल्या प्रकरणी दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्यात हवालदार विनायक कळंगुटकर आणि कॉन्स्टेबल आनंद नाईक यांचा समावेश आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी तसा आदेश जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT