Vedanta Mining In Goa: सहा वर्षानंतर गोव्यात खाण व्यवसायाचा श्रीगणेशा, सेसा वेदांताचा ब्लॉक-1 कार्यान्वित

Vedanta Mining In Goa: सर्वोच्च न्यायालयाने 88 खाण लीज रद्द केल्यानंतर मार्च 2018 मध्ये गोव्यातील खाणकाम ठप्प झाले होते.
Vedanta Sesa
Vedanta Sesa Gomantak Digital Team
Published on
Updated on

Vedanta Mining In Goa

तब्बल सहा वर्षांनी राज्यात खाण व्यवसायाला प्रारंभ झाला आहे. सेसा- वेदांताच्या डिचोली येथील ब्लॉक-१वर आज खाणकाम सुरू करण्यात आले. ही आनंदाची बाब मानली जात असून, भविष्यात खनिज उद्योग भरारी घेईल, अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 88 खाण लीज रद्द केल्यानंतर मार्च 2018 मध्ये गोव्यातील खाणकाम ठप्प झाले होते.

महिन्यापूर्वीच सदर ब्लॉकसाठी पर्यावरण मंत्रालयाकडून ना-हरकत दाखल मिळाला होता. डिचोली नगराध्यक्ष कुंदन फळारी, सेसा गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन जाजू, मये सरपंच विद्यानंद कार्बोटकर, माजी आमदार नरेश सावळ, ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष सतीश गावकर, सदस्य व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

खाण ब्लॉकसाठी 2022 मध्ये झालेल्या लिलावात वेदांता लिमिटेड अव्वल बीडर म्हणून समोर आला. 485 हेक्टरमध्ये पसरलेल्या डिचोली मायनिंग ब्लॉकसाठी 63.55 टक्के महसूल मिळवत वेदांता सर्वाधिक बोली लावली होती.

खाण लीज नूतनीकरण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर मार्च 2018 मध्ये गोव्यातील खाण उत्खनन ठप्प झाले. त्यानंतर डिचोली मिनरल ब्लॉक लिलाव झालेली पहिली खाण आहे.

Vedanta Sesa
Goa CM In Karnataka: कुमारस्वामींचा अर्ज दाखल करण्यासाठी सीएम सावंत सीमापार; सोबतीला येडियुरप्पा आणि तेजस्वी सूर्या

डिचोली मिनरल ब्लॉक ही राज्यातील पहिली लिलाव झालेली खाण आहे. मोठ्या महसूल वाट्यासह राज्याचा विकास आणि स्थानिकांच्या कल्याणासाठी सरकारसोबत काम करण्याचे, कंपनीने स्पष्ट केले आहे.

वेदांताला डिचोली ब्लॉकमधून दरवर्षी 3 दशलक्ष टन लोह खनिज काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने नऊ खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला आहे, त्यापैकी वेदांता उत्खनन करण्यासाठी संमती मिळवणारी पहिली कंपनी ठरली आहे.

सेसाचे सीईओ जाजू यांनी उज्ज्वल भविष्याचा आशावाद व्यक्त केला. खाणकाम सुरू होणे स्थानिक समुदाय व राज्याची अर्थव्यवस्था या दोहोंसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com